Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedविविध चित्रप्रकारांतून उलगडले 'आर्ट मॅजिक' चित्रकला प्रदर्शन* *आर्ट मॅजिकच्या वतीने...

विविध चित्रप्रकारांतून उलगडले ‘आर्ट मॅजिक’ चित्रकला प्रदर्शन* *आर्ट मॅजिकच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे आयोजन : विनामूल्य प्रवेश*

पुणे : अ‍ॅक्रिलिक पेंटिंग, पोर्ट्रेट, वॉटर कलर पेंटिंग, पेंन्सिल स्केचिंग अशा विविध माध्यमातून कलाकारांनी त्यांच्या प्रतिभेला मुक्तपणे मांडत ‘आर्ट मॅजिक’ हे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. ‘आर्ट मॅजिक’ हे १८ वे चित्रकला प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले असून प्रदर्शनात १५० चित्रांचा समावेश आहे.

आर्ट मॅजिकच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार, अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उद्घाटनाला ज्येष्ठ चित्रकार अल्हाद नाईक, सायली दामले हे उपस्थित होते. वय ५ वर्षे ते ६५ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. या प्रदर्शनात तब्बल ७५ कलाकार सहभागी झाले आहेत.

प्रदर्शनात श्लोका धुमाळ, ऋचा पोतदार, लावण्या गायकवाड, सिया पांडे, सार्थक चव्हाण, नील पायगुडे, श्लोक चव्हाण, विवान गुजर, शौनक वाघोलीकर, अर्थव सावंत, काव्या पाटील, अनुष्का साळुंखे, विराज कुलकर्णी, काजल कांबळे, अधिश उदेकर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, नवामी गोसावी यांसह अनेक कलाकारांची चित्रे आहेत. प्रदर्शनाचे संयोजन संयोजन अनुजा जोशी, ऋचा पोतदार, सार्थक चव्हाण, सिया पांडे, श्लोका धुमाळ, निल पायगुडे यांनी केले आहे. महालक्ष्मी पवार या मुलांना कला शिकवण्यासोबतच त्यांना नॅशनल व इंटरनॅशनल पातळीवर काम करायला शिकवतात व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करतात.

द मॅस्ट्रो पेंटर व्हि.एस. गायतोंडे इंटरनॅशनल अॅवाॅर्ड ने महालक्ष्मी पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. आर्ट मॅजिक संस्थेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. दिनांक ३० एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत पुणेकरांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. तरी कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments