Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedविख्यात इतिहास संशोधक लेखिका मानोशी सिन्हा लिखित सॅफ्रॉन स्वोर्डस ह्या ग्रंथाचे मिलिंद...

विख्यात इतिहास संशोधक लेखिका मानोशी सिन्हा लिखित सॅफ्रॉन स्वोर्डस ह्या ग्रंथाचे मिलिंद रथकंठीवार यांनी अनुवादित केलेल्या मराठी ग्रंथाचे प्रकाशन

पुणे
(प्रतिनिधी)
विख्यात इतिहास संशोधक लेखिका मानोशी सिन्हा लिखित
सॅफ्रॉन स्वोर्ड या ग्रंथाच्या मिलिंद रथकंठीवार यांनी केलेल्या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन निवृत्त दिवाणी न्यायधीश डॉ श्रीराम करंदीकर यांचे हस्ते आसाम येथील काझीरगंगा स्थित डी कोर्टयार्डच्या प्रांगणात मोठ्या थाटात प्रकाशन झाले.ह्यावेळी स्टेट बँकेचे निवृत्त उपमहा व्यवस्थापक अजय जोशी हे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत रथकंठीवार ह्यांनी केले.सुमेधा जोशी ह्यांनी आभार मानले.
ह्या प्रसंगी भाषांतरकार मिलिंद रथकंठीवार यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले की,”भारतीय इतिहासाच्या ग्रंथातील अनेक पृष्ठ गहाळ झालेली आहेत.त्यातील काही व्यक्तिमत्वे ही larger than life अशी रंगवली आहेत तर काहींची नावे जाणून बुजून दुर्लक्षित ठेवलेली आहेत.खरा इतिहास नवीन पिढीसमोर येणे गरजेचे आहे त्या दृष्टीने तशी इतिहासात ठरवलेली पाने शालेय अभ्यासक्रमात ती शिकवली जाणे गरजेचे आहे.या दृष्टीने
मानोशी सिन्हा यांची इतिहासाविषयी ग्रंथसंपदा ही सर्व भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी यासाठी मी मराठीत अनुवाद करून उपलब्ध करून दिले आहे ही माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना अजय जोशी यांनी मिलिंद रथकंठीवार ह्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असून लेखक,चित्रकार,भाषांतरकार, गायक,आहेत.व्यक्ती एक अभिव्यक्ती अनेक या उक्ती चे सार्थ करणारे मिलिंद रथकंठीवार यांचे व्यक्तिमत्व आहे”असे प्रतिपादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments