Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅनरा रोबेको आणत आहे कॅनरा रोबेको मल्टि-असेट अलोकेशन फंड

कॅनरा रोबेको आणत आहे कॅनरा रोबेको मल्टि-असेट अलोकेशन फंड

नागपूर,८ मे, २०२५: कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत जुन्या असेट व्यवस्थापन कंपनीने आज कॅनरा रोबेको मल्टि असेट अलोकेशन फंड बाजारात आणत असल्याची घोषणा केली. हा एक खुला हायब्रिड फंड असून बाजारात तेजी असताना अतिरिक्त मोबदला कमावणे आणि बाजारातील मंदीच्या कालखंडात घसरणीची जोखीम कमी करणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

हा फंड म्हणजे इक्विटी आणि इक्विटीशी निगडित साधने, डेट आणि मनी मार्केट साधने, गोल्ड ईटीएफ्स आणि सिल्व्हर ईटीएफ्स यांच्यात गुंतवणूक करणारी खुली (ओपन-एण्डेड) योजना आहे. सक्रिय मल्टि असेट वितरण धोरणाचे उद्दिष्ट बाजाराच्या सर्व परिस्थितींमधून मार्ग काढणे हेच आहे. बदलते आर्थिक घटक प्रतिसाद देत असेट वर्गांचे काळानुसार अनुकूलन करण्यावर, वेग साध्य करण्यावर, बाजाराच्या मूल्यांकनावर आणि इक्विटी जोखीम प्रिमियम व पोर्टफोलिओचे समायोजन सुलभ करण्यावर नवीन फंड लक्ष केंद्रित करणार आहे.

न्यू फंड ऑफर (एनएफओ) ९ मे, २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होणार आहे आणि २३ मे, २०२५ रोजी बंद होणार आहे.

“कॅनरा रोबेको मल्टि असेट अलोकेशन फंड केवळ आमच्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करणारा नाही, तर गुंतवणूकदाराला बाजाराच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या गरजांची पूर्तता करणाऱ्या वैविध्यपूर्ण उत्पादने पुरवून सक्षमही करतो,” असे कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश नरुला म्हणाले. “गुंतवणूकदारांसाठी सातत्याने नवीन फंडांचा विकास करून त्यांना लवचिक पोर्टफोलिओ तयार करण्यास सक्षम करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. हे पोर्टफोलिओ त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांशी मिळतेजुळते असतील आणि उत्पादन विकासातील सातत्यपूर्ण सुधारणा व उत्कृष्टता यांची आमची संस्कृतीही त्यातून जोपासली जाईल.”

या योजनेत एकूण असेट्सपैकी ६५-८० टक्के इक्विटी व इक्विटीशी निगडित साधनांमध्ये वितरित केले जातील, १०-२५ टक्के असेट्स गोल्ड व सिल्व्हर ईटीएफ्समध्ये आणि १०-२५ टक्के डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये वितरित केले जातील. या योजनेद्वारे आरईआयटी आणि इन्व्हायटींमध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते.

“कॅनरा रोबेको मल्टि असेट अलोकेशन फंडाचे उद्दिष्ट दीर्घकाळात कमीत-कमी चढउतारांसह वाजवी मोबदला मिळवून देणे हे आहे. इक्विटी भाग दीर्घकालीन अधिमूल्यन पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवेल, तर गोल्ड आणि सिल्व्हरमधील ईटीएफ वितरणामुळे चलनवाढ व अनिश्चिततांपासून संरक्षण पुरवले जाईल आणि डेटमधील वितरणामुळे पोर्टफोलिओचा समतोल राखला जाईल,” असे कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या इक्विटीज विभागाचे प्रमुख श्री. श्रीदत्ता भांडवलदार म्हणाले. “हा फंड गुंतवणूकदारांना धोरणात्मक लाभ देईल तसेच तेजीचा संभाव्य लाभ घेण्याची संधी हा फंड गुंतवणूकदारांना देऊ शकतो आणि घसरणीचा परिणाम कमी करू शकतो.”

“या फंडाकडे सर्व डेट व मनी मार्केट साधनांमध्ये तसेच सर्व कालावधींमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता आहे. त्यामुळे असेट वर्गांमध्ये विविधीकरण शोधणाऱ्या गुंतणूकदारांसाठी हा फंड अनुकूल आहे,” असे कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमधील फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख श्री. अवनिश जैन म्हणाले. “हा फंड कालावधींचे व्यवस्थापन गतीशीलतेने करतो आणि घसरणीच्या काळात नुकसान हाताळताना बाजारात सहभाग घेणे गुंतवणूकदारांना शक्य होते.”

फंडातील इक्विटी भाग बाजार भांडवलीकरण, शैली आणि विभाग निरपेक्ष असेल आणि सर्व बाजारचक्रांमध्ये गुणवत्ता सिद्ध केलेल्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असलेल्या उच्च क्षमतेच्या पोर्टफोलिओत गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट या भागापुढे असेल. त्यामुळे पोर्टफोलिओला मजबूती येईल, त्यात अनेकविध कंपन्यांचे एकत्रीकरण असेल तसेच बाजारातील वाटा वाढत असलेल्या उदयोन्मुख कंपन्यांचाही यात समावेश असेल. या कंपन्या श्रेष्ठ उत्पन्न वाढीच्या माध्यमातून पोर्टफोलिओला अधिक उत्पन्न कमावण्याची संधी देतील. त्याच वेळी सक्रियरित्या व्यवस्थापित गोल्ड आणि सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समधील (ईटीएफ्स) वितरण आणि गतीशील निश्चित उत्पन्न साधनांमुळे पोर्टफोलिओला अनुक्रमे संरक्षण व सशक्तता प्राप्त होईल.

“कॅनरा रोबेको मल्टि असेट अलोकेशन फंड गतीशील असेट वितरणासाठी एक चतुर उपाय पुरवतो. तसेच इक्विटी, डेट आणि गोल्ड व सिल्व्हर ईटीएफ्स या ३ असेट वर्गांची शक्ती जोपासून गुंतवणूकदारांना एक बहुआयामी मिश्रण देऊ करतो. नियमित रोखतेचा प्रवाह हवा असलेल्या गुंतवणूकदारांसाठीही हा फंड सिस्टमॅटिक विड्रावल प्लान (एसडब्ल्यूपी) सुविधेच्या माध्यमातून अनुकूल ठरू शकतो,” असे कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या विक्री व मार्केटिंग विभागांचे प्रमुख श्री. गौरव गोयल म्हणाले. “आमच्या सहयोगींशी अधिक चांगला संवाद होत राहावा म्हणून आम्ही स्थानिक भाषांमध्ये मार्केटिंग साहित्य विकसित केले आहे. त्याशिवाय आम्ही मल्टि असेट अलोकेशन फंड (एमएएएफ) ही संकल्पना मजेशीर पद्धतीने व सुलभतेने समजावून सांगण्यासाठी एक रॅप साँगही तयार केले आहे. त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना फंडाबाबत समजून घेण्यात मदत होणार आहे.”

कॅनरा रोबेको मल्टि असेट अलोकेशन फंडाचे बेंचमार्किंग बीएसई टू हंडरेड टीआरआयशी ६५ टक्के + निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट इंडेक्सशी २० टक्के + सोन्याच्या देशांतर्गत किमतीशी १० टक्के + चांदीच्या देशांतर्गत दरांशी ५ टक्के असे केले जाणार आहे.

श्री. अमित कदम (इक्विटी), श्रीमती एनेट फर्नांडिस (इक्विटीज) आणि श्री. कुणाल जैन (फिक्स्ड इन्कम) हे फंड व्यवस्थापक कॅनरा रोबेको मल्टि असेट अलोकेशन फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया योजनेचे स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट वाचा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments