Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हीटीपी रिअल्टीला दिल्लीत १६वा सीआयडीसी पुरस्कार प्रदान!

व्हीटीपी रिअल्टीला दिल्लीत १६वा सीआयडीसी पुरस्कार प्रदान!

पुणे, ९ मे, २०२५ : व्हीटीपी रिअल्टीला १६व्या सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कारांतर्गत बांधकाम आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण विषयक असलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या मूल्यमंत्राशी सुसंगत असलेल्या व्हीटीपी रिअल्टीसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. पुण्यातील व्हीटीपी बेल्लिसिमो आणि व्हीटीपी सिएरा या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मिळालेला हा पुरस्कार केवळ एक सन्मान नाही, तर त्यांच्या आरोग्यदायी आणि सुरक्षित टाउनशिप तयार करण्याच्या प्रयत्नांचा पुरावा आहे.

सखोल मूल्यमापन प्रक्रिया आणि स्थळावर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बांधकाम उद्योग विकास परिषद (सीआयडीसी)च्या व्यवस्थापन मंडळाने आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण’ या श्रेणीत व्हीटीपी रिअल्टीला हा पुरस्कार प्रदान केला. पुण्यातील हिंजवडी फेज १ येथील व्हीटीपी बेल्लिसिमो आणि पाषाण-सुस बाणेर रोडवरील व्हीटीपी सिएरा या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट आरोग्य व सुरक्षितता पद्धती, पर्यावरणपूरक नियोजन आणि एकात्मिक समुदायजीवन यावरील व्हीटीपी रिअल्टीने दिलेला भर पाहता या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीमध्ये विशेष छाप पडली.

सीआयडीसी ही अर्धसरकारी संस्था भारत सरकारला सल्ला देते, कंत्राटांचे नियम ठरवते, बांधकाम क्षेत्रासाठी लोकांचे प्रशिक्षण करते आणि कंपन्यांचे मूल्यांकन करते. तसेच ठराविक प्रक्रियेनुसार विजेत्यांची निवड करते. सुरुवातीला प्रत्येक कंपनीकडून त्यांच्या शाश्वततेच्या कामाबद्दल माहिती मागवली जाते. मग सरकारी प्रतिनिधी त्या माहितीचे परीक्षण करून प्रकल्पांची गुणवत्ता, नियमांचे पालन आणि डिझाइन तपासतात. त्यानंतर अचानक प्रकल्प स्थळी पाहणीही केली जाते. पाच महिन्यांच्या कठीण निवड प्रक्रियेचे हे सर्व टप्पे पार करून व्हीटीपी रिअल्टीने प्रत्येक टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत हा पुरस्कार मिळवला.

या यशाबद्दल बोलताना व्हीटीपी रिअल्टीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्हणाले, “सर्वोच्च आरोग्य, सुरक्षा आणि बांधकाम गुणवत्ता राखत समृद्ध जीवन देणाऱ्या विचारशील जागा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न या पुरस्कारामुळे अधिक बळकट झाला आहे. सीआयडीसीकडून मिळालेला हा पुरस्कार आमच्या जबाबदार आणि भविष्यात विकासाच्या हेतूने कटिबद्ध राहण्याचा अभिमानास्पद पुरावा आहे.”

सीआयडीसीकडून मिळालेला हा प्रतिष्ठित सन्मान रिअल इस्टेट विकासाच्या प्रत्येक पैलूमध्ये व्हीटीपी रिअल्टीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचा ठोस पुरावा आहे. आज व्हीटीपी रिअल्टी केवळ पुण्यातील निर्विवाद रिअल इस्टेट कंपनी म्हणूनच ओळखली जात नाही, तर भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांमध्येही तिची गणना केली जाते. नवोपक्रम आणि ग्राहक-केंद्रित डिझाइन यावर तीव्र भर देत व्हीटीपी रिअल्टी सातत्याने उद्योगासाठी नवीन मापदंड स्थापित करत आहे. व्हीटीपी रिअल्टी आपल्या प्रतिष्ठित प्रकल्पांद्वारे पुण्याची स्कायलाईन आणि लक्झरी जीवनशैली घडवताना, भविष्यातही प्रेरणादायी समुदाय घडवण्याच्या आणि ग्राहकांचे जीवन अधिक उंचावण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments