Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रेडाई-पुणे मेट्रो आणि कुमार रिअॅल्टी तर्फे बांधकाम कामगारांसाठी ‘आभार सप्ताह’ आयोजित

क्रेडाई-पुणे मेट्रो आणि कुमार रिअॅल्टी तर्फे बांधकाम कामगारांसाठी ‘आभार सप्ताह’ आयोजित

पुणे, ९ मे २०२५: आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त क्रेडाई-पुणे मेट्रो च्या वतीने १ मे ते ७ मे २०२५ दरम्यान ‘आभार सप्ताह’ आयोजित करण्यात आला. या सप्ताहानिमित्त कुमार रिअॅल्टी आणि क्रेडाई-पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने हिंजवडी येथील मेगापोलिस प्रकल्पस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ३०० बांधकाम कामगार आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्रेडाई-पुणे मेट्रोच्या लेबर वेल्फेअर कमिटीमार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात, जसे की बेस्ट फॅसिलिटी पुरस्कार, सेफ्टी अवॉर्ड्स, वैद्यकीय शिबिरे, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी BOCW (इमारत व अन्य बांधकाम क्षेत्रातील कामगार) नोंदणी, आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे. गेल्या आर्थिक वर्षात खालील प्रमाणे कामगारांना या योजनांचा लाभ मिळाला आहे:

ü BOCW (इमारत व अन्य बांधकाम क्षेत्रातील कामगार) नोंदणी – १०,३६२

ü आयुष्मान भारत – ४,५६०

ü ई-श्रम योजना – १,७०९

ü सुरक्षा कीट वाटप – १०,५६०

ü कामगारांच्या मुलांसाठी आरोग्य व पोषण सेवा – २५,६०५

ü कामगारांच्या मुलांचे लसीकरण – ७००

‘‘श्रमिक सन्मान, आपका योगदान, हमारा अभिमान” या संकल्पनेवर आधारित या सप्ताहात, कामगारांच्या अमूल्य योगदानाला ओळख देत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत आणि शपथ विधीने झाली. या वेळी BOCW (इमारत व अन्य बांधकाम क्षेत्रातील कामगार) अजय हेल्थकेअरच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या आरोग्य तपासणी शिबिर आणि टीटी लसीकरण मोहिमेसाठी सुमारे ३०० लाभार्थी लाभले होते तसेच या कार्यक्रमानंतर कामगार छावणी परिसराला भेट देऊन त्यांना मार्गदर्शन देण्यात आली.

संपूर्ण आठवड्यात BOCW नोंदणी शिबिरे, सुरक्षा प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, आवश्यक कीट वाटप, कौशल्य विकास कार्यशाळा आणि कल्याणकारी योजनांची माहिती देणारे सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश केवळ तात्कालिक मदत नव्हे, तर दीर्घकालीन सशक्तीकरण आणि सन्मान देणे होता.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही मान्यवर पाहुण्यांचा समावेश होता: श्री. जे. पी. श्रोफ, उपाध्यक्ष, क्रेडाई-पुणे मेट्रो; सौ. सपना राठी, संयोजिका, कामगार कल्याण समिती, क्रेडाई महाराष्ट्र; श्री. मिलिंद तलाठी, संयोजक, कामगार कल्याण समिती, क्रेडाई-पुणे मेट्रो; श्री. गोपाल ओझा, श्री. आकाश चोरडिया, सौ. अन्मोल कुक्रेजा, सदस्य, कामगार कल्याण समिती; कर्नल (निवृत्त) कुमार रामचंद्रन, महासंचालक, क्रेडाई-पुणे मेट्रो; श्री. सुनील कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार रिअॅल्टी; श्री. समीर पारखी, कामगार कल्याण अधिकारी, क्रेडाई-पुणे मेट्रो; श्री. प्रदीप ईश्वरकट्टी, कनिष्ठ अभियंता, क्रेडाई-पुणे मेट्रो; डॉ. प्रकाश कदम, सहाय्यक महाव्यवस्थापक (HR व प्रशासन), कुमार रियल्टी; श्री. हर्षल पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक, EHS, कुमार रिअॅल्टी

श्री. जे. पी. श्रोफ, उपाध्यक्ष, क्रेडाई-पुणे मेट्रो यांनी सांगितले, “कृतज्ञता ही सर्व भावनांची जननी आहे, असे म्हटले जाते आणि ते अगदी खरं आहे. ‘आभार सप्ताहा’च्या माध्यमातून आपण आपल्या क्षेत्रातील अदृश्य हिरोंना – कामगारांना सलाम करत आहोत. कुमार रिअॅल्टीच्या सहकार्याने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे आपली स्वप्ने साकार करणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची आम्हाला एक मौल्यवान संधी मिळाली.असे उपक्रम आम्ही इतर प्रकल्पांवरही राबवत राहू.”

सौ. सपना राठी, संयोजिका, कौशल्य विकास, कामगार कायदे, सुरक्षा आणि प्रशिक्षण समिती, क्रेडाई महाराष्ट्र यांनी सांगितले, “आपण ज्या प्रत्येक वास्तूचं कौतुक करतो, ज्या घरांवर प्रेम करतो, त्या सगळ्या आपल्या बांधकाम कामगारांच्या निष्ठावान मेहनतीवर उभ्या आहेत. ‘आभार सप्ताह २०२५’ केवळ एक उत्सव नाही, तर आपल्या शहरांना, समाजांना आणि भविष्यास आकार देणाऱ्या हातांचे मनःपूर्वक केलेले कौतुक आहे. प्रगती ही केवळ आपण काय बांधतो त्यावरून मोजली जात नाही, तर ती बांधणाऱ्या माणसांचा आपण किती सन्मान करतो यावरूनही ठरते.”

श्री. मिलिंद तलाठी, संयोजक, कामगार कल्याण समिती, क्रेडाई-पुणे मेट्रो यांनी सांगितले, “आपण केवळ शहरे उभारत नाही, तर जीवने समृद्ध करत आहोत. आपल्या कामगारांच्या चेहऱ्यावर उमटलेली प्रत्येक हसू, त्यांच्या आत्मसन्मानाचे प्रत्येक पाऊल आणि त्यांच्या अंतःकरणात पेटवले गेलेले प्रत्येक स्वप्न — ही सर्व एक उज्वल उद्याची पायाभरणी आहे. प्रत्येक उंच इमारतीच्या मागे एक मूक नायक उभा असतो. ‘आभार सप्ताह’ हे अशा सर्व बांधकाम कामगारांना आमचे मन:पूर्वक अभिवादन आहे — जे फक्त शहरं नाही, तर त्यातली स्वप्नंही घडवतात.”

श्री. सुनील कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार रिअॅल्टी यांनी सांगितले, “क्रेडाई-पुणे मेट्रोचा हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. अनेकदा आपण आपल्या कामगारांचे योगदान न ओळखता त्यांना गृहित धरतो. आता वेळ आली आहे की आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि ती मनापासून जाणवावी. असा उपक्रम निश्चितच कामगारांचे मनोबल वाढवेल आणि सर्व प्रकल्पांमध्ये एक सकारात्मक व विशेष वातावरण निर्माण करेल. या उपक्रमासाठी आणि कुमार रिअॅल्टीला त्याचा भाग बनवल्याबद्दल आम्ही क्रेडाई-पुणे मेट्रोचे मनःपूर्वक आभार मानतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments