Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात सर्वात स्लिम एफ सिरीज स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी' लाँच

सॅमसंगकडून भारतात सर्वात स्लिम एफ सिरीज स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी’ लाँच

गुरूग्राम, भारत – मे ८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज एफ-सिरीज पोर्टफोलिओमधील सर्वात स्लिम स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी’च्‍या लाँचची घोषणा केली. हा स्‍मार्टफोन फक्‍त ७.२ मिमी स्लिम आहे आणि फ्लॅगशिप ग्रेड कॅमेरा, अँड्रॉइड अपग्रेड सायकलच्‍या ६ जनरेशन्‍स, पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस+ संरक्षण व प्रगत एआय एडिटिंग टूल्‍स अशा विविध सेगमेंट-लीडिंग वैशिष्‍ट्यांसह अग्रस्‍थानी आहे.

“गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी च्‍या लॉंचसह सॅमसंग शक्तिशाली, फ्यूचर-रेडी तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचे जीवन सक्षम करण्‍यासाठी अर्थपूर्ण इनोव्हेशन सादर करण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये डिझाइन व कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जे आपल्‍या जीवनशैलीशी पूरक स्‍मार्टफोनचा शोध घेणाऱ्या तरूण ग्राहकांना उच्‍च स्‍तरीय अनुभव देते,” असे असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे संचालक अक्षय एस. राव म्‍हणाले.

फ्लॅगशिप ग्रेड कॅमेरा

गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये फ्लॅगशिप-ग्रेड ५० मेगापिक्‍सल ओआयएस ट्रिपल कॅमेरा आहे, ज्‍यामुळे हाय-रिझॉल्‍यूशन व शेक-फ्री व्हिडिओज व फोटोज कॅप्‍चर करता येतात. तसेच, या स्‍मार्टफोनमध्‍ये आकर्षक व वैविध्‍यपूर्ण सेल्‍फीज कॅप्‍चर करण्‍यासाठी आकर्षक १२ मेगापिक्‍सल एचडीआर फ्रण्‍ट कॅमेरा देखील आहे. गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मधील कॅमेरा अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यासाठी बिग पिक्‍सल टेक्‍नॉलॉजी, लो नॉइस मोड आणि एआय आयएसपी ही वैशिष्‍ट्ये उपयुक्‍त ठरतात, ज्‍यामुळे या स्‍मार्टफोनची नाइटोग्राफी नव्‍या उंचीवर पोहोचली आहे. या स्‍मार्टफोनच्‍या रिअर कॅमेऱ्यामध्‍ये पोर्ट्रेट २.० सह २X झूम देखील आहे, जे सुस्‍पष्‍ट व नैसर्गिक बोकेह इफेक्‍ट देते. वापरकर्ते १०-बीट एचडीआरमध्‍ये ४के ३० एफपीएस व्हिडिओज रेकॉर्ड करू शकतात, वास्‍तविक आऊटपुटसाठी अनेक रंगसंगती कॅप्‍चर करू शकतात. गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये ऑब्‍जेक्‍ट इरेजर, एडिट सजेशन्‍स यांसारखी प्रगत एआय-पॉवर्ड एडिटिंग टूल्‍स देखील असतील, जी प्रत्‍येक फोटो व व्हिडिओला सोशल मीडियावर पोस्‍ट करण्‍यासाठी सुसज्‍ज करतील.

नवीन डिझाइन, डिस्‍प्ले आणि अद्वितीय टिकाऊपणा

गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी फक्‍त ७.२ मिमी स्लिम आहे आणि या स्‍मार्टफोनच्‍या पुढील व मागील बाजूस कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® संरक्षण आहे, ज्‍यामुळे हा शक्तिशाली व एर्गोनॉमिक स्‍मार्टफोन आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये ६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी+ डिस्‍प्‍लेसह १२०० नीट्स हाय ब्राइटनेस मोड (एचबीएम) आणि व्हिजन बूस्‍टर तंत्रज्ञान आहे, ज्‍यामधून खात्री मिळते की वापरकर्ते प्रखर सूर्यप्रकाशात देखील त्‍यांच्‍या आवडत्‍या कन्‍टेन्‍टचा आनंद घेऊ शकतात. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सोशल मीडिया फिडमधून स्‍क्रॉलिंग सहज व सोपे करते. मागील बाजूस असलेले ग्‍लास संरक्षण आणि गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी वरील मेटल कॅमेरा डेको अत्‍यंत लोकप्रिय गॅलॅक्‍सी एफ सिरीजमध्‍ये उत्‍साहवर्धक व प्रीमियम डिझाइन अपग्रेड आणतात. हा स्‍मार्टफोन ग्रीन व व्‍हायोलेट या दोन आकर्षक रंगांमध्‍ये येईल.

शक्तिशाली कार्यक्षमता

एक्झिनॉस १४८० प्रोसेसरच्‍या शक्‍तीसह एलपीडीडीआर५एक्‍स असलेला गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी अत्‍यंत गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम आहे. ५जी ची अल्टिमेट स्पीड आणि कनेक्‍टीव्‍हीटीसह वापरकर्ते कुठेही कनेक्‍टेड राहू शकतात, जलद डाऊनलोड्स, सुलभ स्‍ट्रीमिंग आणि विनाव्‍यत्‍यय ब्राऊजिंगचा आनंद घेऊ शकतात. प्रोसेसर फ्लॅगशिप लेव्‍हल वेपर कूलिंग चेम्‍बर आणि उच्‍च दर्जाचे ऑडिओ व व्हिज्‍युअल्‍सच्‍या माध्‍यमातून सुलभ मोबाइल गेमिंग अनुभव देते.

गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळपर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद देते. मोठ्या क्षमतेच्‍या बॅटरीमुळे वापरकर्त्‍यांना कनेक्‍टेड राहण्‍यास, विनाव्‍यत्‍यय मनोरंजनाचा आनंद घेण्‍यास आणि उत्‍पादनक्षम राहण्‍यास मदत होते. तसेच, गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये ४५ वॅट सुपर-फास्‍ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्‍यामुळे डिवाईस कमी वेळेत लवकर चार्ज होतो आणि तुम्‍ही दिवसभर कनेक्‍टेड व उत्‍पादनक्षम राहू शकता.

गॅलॅक्‍सी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस

गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी सेगमेंटमधील अँड्रॉइड अपग्रेड्सच्‍या सर्वोत्तम ६ जनरेशन्‍स आणि ६ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्ससह नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामुळे फ्यूचर-रेडी अनुभवाची खात्री मिळते. हा स्‍मार्टफोन वन यूआय ७ आऊट ऑफ द बॉक्‍ससह येईल.

वन यूआय ७ साध्‍या, प्रभावी व इमोटिव्‍ह डिझाइनसह येते, ज्‍यामधून गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांना सुव्‍यवस्थित व कोहेसिव्‍ह अनुभव मिळेल. सुलभ होम स्क्रिन, रिडिझाइन केलेले वन यूआय विजेट्स आणि लॉक स्क्रिन वापरकर्त्‍यांना त्‍यांचे डिवाईसेस विनासायासपणे कस्‍टमाइज करण्‍याची सुविधा देतात. अधिक सोयीसुविधेसाठी नाऊ बार लॉक स्क्रिनवर सर्वात महत्त्वाचे असलेले रिअल-टाइम अपडेट्स देते. ज्‍यामुळे सकाळच्‍या वेळी रनिंगदरम्‍यान वापरकर्ते सहजपणे त्‍यांची प्रगती तपासू शकतात आणि गॅलॅक्‍सी बड्सवर आवडती गाणी ऐकण्‍याचा आनंद घेऊ शकतात, हे सर्व सिम्‍पल स्‍वाइपसह करता येते, ज्‍यासाठी फोन अनलॉक करण्‍याची गरज भासत नाही. याव्‍यतिरिक्‍त, सखोल गुगल जेमिनी इंटीग्रेशनसह मित्रासोबत बोलण्‍याप्रमाणे डिवाईस सहजपणे नियंत्रित करता येतो.

गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य ‘सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट’ देखील असेल. ही हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर व सॉफ्टवेअर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देते. सॅमसंगने गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी मध्‍ये सॅमसंग वॉलेटसह नाविन्‍यपूर्ण टॅप अँड पे वैशिष्‍ट्याला देखील सादर केले आहे, ज्‍यामुळे ग्राहक कार्यक्षमपणे व सुरक्षितपणे पेमेंट्स करू शकतात.

उत्‍पादन

व्‍हेरिएण्‍ट

सुरूवातीची किंमत

ऑफर्स

गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी

८ जीबी + १२८ जीबी

२५,९९९ रूपये

२००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटसह

८ जीबी + २५६ जीबी

२८,९९९ रूपये

२००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटसह

आजपासून गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी २ स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. ग्राहक सॅमसंग फायनान्‍स+ आणि सर्व आघाडीच्‍या एनबीएफसी सहयोगींच्‍या माध्‍यमातून प्रतिमहिना १५५६ रूपयांपासून सुरू होणाऱ्या सोप्‍या ईएमआय पर्यायांसह गॅलॅक्‍सी एफ५६ ५जी खरेदी करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments