v एनएफओ 5 मे 2025 रोजी सुरू होईल आणि 16 मे 2025 रोजी बंद होईल
v ही योजना भारतातील अग्रणी 50 शेअर्समध्ये गुंतवणूक करेल
मुंबई, 5 मे 2025: एंजेल वन लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एंजेल वन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने एंजेल वन निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि एंजेल वन निफ्टी 50 ईटीएफ हे दोन नवीन पॅसिव्ह फंड्स सादर केले आहेत. न्यू फंड ऑफरिंग्ज (NFOs) 5 मे 2025 ते 16 मे 2025 दरम्यान सबस्क्रीप्शनसाठी खुले असतील.
हे दोन्ही फंड्स निफ्टी 50 इंडेक्सचा मागोवा घेण्यासाठी डिझाइन केले गेले असून ते युनिटधारकांना दूरसंचार, तेल आणि वायू, आर्थिक सेवा, आरोग्यसेवा आणि वाहन उद्योग यांसारख्या 15 प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतातील अग्रणी 50 लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा लाभ देतात. साधेपणा, स्थिरता आणि खर्च कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून, हे फंड्स भारताच्या विकासकथेचा भाग होण्यासाठी एक उत्तम संधी पुरवत आहेत. या योजना खर्चाआधीचे परतावे प्रदान करताना इंडेक्सच्या एकूण परताव्याच्या जवळपास कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतात
एंजेल वन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमेन भाटिया म्हणाले, “लार्ज कॅप इक्विटीजमध्ये सहभागी होण्यासाठी थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करणे किंवा अॅक्टिव्ह अथवा पॅसिव्ह योजनांमार्फत म्युच्युअल फंड मार्गाचा अवलंब करणे असे विविध मार्ग आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराला लार्ज कॅप सेगमेंटमध्ये एक्सपोजर घ्यायचे असेल तर निफ्टी 50 इंडेक्सचा मागोवा घेणाऱ्या इंडेक्स फंड किंवा ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा एक तर्कसुसंगत पर्याय आहे. कारण त्यामुळे स्टॉक सिलेक्शन आणि मानवी निर्णय घेण्यासारख्या पद्धतशीर नसलेल्या जोखमी दूर होतात.”
NFO ची वैशिष्ट्ये
वरील NFOs अनेक गुंतवणूकदार अनुकूल वैशिष्ट्यांसह येतात. त्यामध्ये एंट्री किंवा एक्झिट लोड नसतो आणि 1,000 रु. ची किमान अर्ज रक्कम असून त्यानंतर 1 रु. च्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते. निफ्टी 50 इंडेक्सचा मागोवा घेतल्यामुळे, हे दोन्ही फंड्स स्टॉक निवडण्याची व अॅक्टिव्ह फंड मॅनेजर निवडीची गरज दूर करतात आणि गुंतवणूकदारांना इंडेक्समध्ये समाविष्ट ब्लू-चिप भारतीय कंपन्यांमध्ये एक्सपोजर देतात.
सहज तरलता आणि शेअरसारखीच ट्रेडिंगची सहज सुलभता मिळवून देत एंजेल वन निफ्टी 50 ईटीएफचे युनिट्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर नोंदणीकृत केले जातील.
एंजेल वन निफ्टी 50 इंडेक्स फंड लवचिक SIP पर्याय देतो. तिथे गुंतवणूकदार 250 रु., 500 रु., 500 रु., 1000 रु. आणि 3000 रु. पासून सुरू होणाऱ्या अनुक्रमे दैनंदिन, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि तिमाही SIP फ्रिक्वेन्सीद्वारे गुंतवणूक करू शकतात. हे विविध पर्याय गुंतवणूकदारांची आर्थिक उद्दिष्टे आणि त्यांची पूर्तता या गोष्टी सुलभ करतात.
या नवीन योजना एंजेल वन म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओ बांधणीसाठी विविध पॅसिव्ह बिल्डिंग ब्लॉक्स उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहेत. ते गुंतवणूकदारांना भारताच्या सर्वात विश्वासार्ह इंडेक्सपैकी एकाद्वारे संपत्ती निर्माण करण्यात सहभागी होण्याची संधी देतात. नाविन्यपूर्णता, पारदर्शकता आणि गुंतवणूकदार केंद्रीत उपायांवर लक्ष केंद्रित करून एंजेल वन म्युच्युअल फंड पॅसिव्ह गुंतवणुकीला आधुनिक आर्थिक नियोजनाचा पाया बनवण्याचे कार्य सुरू ठेवतो.


