स्कोडाने ऑल-न्यू कोडियकच्या डिलिव्हरीजना सुरूवात केली आहे, जेथे या वेईकलमध्ये सर्वोत्तम युरोपियन तंत्रज्ञान आणि लक्झरी समाविष्ट आहे
· २.० टीएसआय इंजिनच्या माध्यमातून टर्बोचार्ज्ड रोमांच सादर, जे सेव्हन-स्पीड ड्युअल क्चल डीएसजी ट्रान्समिशनसह १५० केडब्ल्यू शक्ती आणि ३२० एएनएम टॉर्क देते
· न्यू जनरेशन कोडियक आता भारतभरातील स्कोडा ऑटोच्या २८० हून अधिक डिलरशिप्समध्ये टेस्ट ड्राइव्ह्जसाठी उपलब्ध आहे
· किंमत ४६.८९ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू
मुंबई, १२ मे २०२५ – स्कोडा ऑटो इंडिया भारतात २५ वर्षे आणि जगभरात १३० वर्षे साजरी करत आहे. स्कोडा ऑटो इंडियाने ग्राहकांना ऑल-न्यू स्कोडा कोडियकच्या डिलिव्हरीज देणे सुरू केले आहे; देशभरातील ग्राहक आजपासून ४x४ एसयूव्हीचा अनुभव घेऊ शकतात. ऑल-न्यू, सेकंड जनरेशन कोडियकमधून स्कोडाची सर्वोत्तम कारागिरी आणि तंत्रज्ञान सर्वोत्तमता दिसून येते, तसेच या वेईकलमध्ये आकर्षक युरोपियन डिझाइनसह ऑफ-रोड क्षमता आणि सेव्हन-सीट वैविध्यता समाविष्ट आहे. फ्लॅगशिप, ऑल-न्यू कोडियकच्या लाँचसह स्कोडा ऑटोने भारतातील आपला पोर्टफोलिओ अधिक दृढ केला आहे, तसेच नुकतेच कायलॅक आणि अत्यंत लोकप्रिय कुशक देखील लाँच करण्यात आल्या आहेत, ज्यासह एसयूव्हीची लाइनअप अधिक दृढ झाली आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, ”ऑल-न्यू कोडियकमध्ये अचूक इंजीनिअरिंगसह अद्वितीय लक्झरी, सेव्हन-सीट वैविध्यता आणि ४x४ क्षमतांचे परिपूर्ण संयोजन आहे. लाँच झाल्यापासून या वेईकलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला आजपासून ग्राहकांसाठी देशभरात डिलिव्हरीजना सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. नुकतेच स्कोडा ऑटो इंडियासाठी ब्रँड संचालक पदभार स्वीकारला असल्यामुळे माझ्यासाठी ही न्यू-जनरेशन कोडियक महत्त्वाचा टप्पा आहे आणि टीम म्हणून आम्ही भारतातील आमच्या विकास प्रवासाच्या नवीन टप्प्याला आकार देत आहोत.”
अग्रस्थानी असलेली लक्झरी
ऑल-न्यू स्कोडा कोडियकमध्ये शक्तिशाली, टर्बोचार्ज्ड २.० टीएसआय इंजिन आणि सेव्हन-स्पीड डीएसजी आहे, तसेच सेव्हन-सीट वैविध्यता, ४x४ क्षमता आणि एआरएआयने प्रमाणित केल्यानुसार १४.८६ किमी/लीटरची इंधन कार्यक्षमता आहे. या वेईकलमध्ये ३२.७७ सेमी इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, सेगमेंट-फर्स्ट सर्वोत्तम स्मार्ट डायल्स, एर्गो मसाज सीट्स, १३-स्पीकर कॅन्टॉन साऊंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ९ एअरबॅग्ज आहेत. जवळपास १,९७६ लीटर सामान कक्ष आणि विशिष्ट नवीन स्टायलिंगसोबत एलईडी क्रिस्टालिनियम हेडलॅम्प्स आणि एक्सक्लुसिव्ह स्पोर्टलाइन व एलअँडके डिझाइन असेंट्स असलेली ऑल-न्यू कोडियक लक्झरी एसयूव्हींमध्ये मापदंड स्थापित करते.
मालकीहक्काचे तत्त्व
स्कोडा ऑटा इंडिया कोडियक मालकांसाठी दर्जात्मक मालकीहक्क आणि मेन्टेनन्स सोल्यूशन्स देखील देईल. ही स्कोडा फ्लॅगशिप ५-वर्ष/१२५,००० किमी (जे अगोदर असेल ते) प्रमाणित वॉरंटीसह १० वर्षांचे कॉम्प्लीमेण्टरी रोड-साइड असिस्टण्स आणि स्कोडा सुपरकेअर पॅकेज देईल, जे पहिल्या वर्षासाठी ग्राहकांकरिता विनामूल्य उपलब्ध आहे.
*****


