Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्वराज हॉस्पिटल तर्फे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रम

विश्वराज हॉस्पिटल तर्फे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रम

पुणे,14 मे 2025 : विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.आदिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

‘आपल्या परिचारिका,आपले भविष्य- परिचरिकांची काळजी घेणे म्हणजे अर्थव्यवस्थेला बळकटी देणे’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.सुजीत कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये नर्सिंग सक्षमीकरण या विषयावर प्रा.डॉ.शिवचरण गंधार यांचे संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर हृदयरोग तज्ञ डॉ.सुरज इंगोले,स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुषमा कुंजीर,ईमर्जन्सी आणि ट्रॉमा युनिटचे प्रमुख डॉ.सनिष गार्डन, सहाय्यक वैद्यकीय संचालक सचिन कातकाडे यांनी आरोग्यसेवा क्षेत्रात परिचारिकांचे महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले.याशिवाय परिचारिकांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा खाद्य महोत्सव,सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला,अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागाच्या प्रमुख सारिका भोसले यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments