Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्लॉस बेंगलोर लिमिटेड च्या 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण...

श्लॉस बेंगलोर लिमिटेड च्या 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण 35,000.00 दशलक्ष रु. (3,500 कोटी रु.) पर्यंतची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 26 मे 2025 रोजी खुली होणार

श्लॉस बेंगलोर लिमिटेड (“इक्विटी शेअर्स”) च्या 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरचा किंमतपट्टा 413 रु. ते 435 रु. निश्चित

· बिड/ऑफर खुली होण्याचा दिनांक – सोमवार, 26 मे 2025 आणि बिड/ऑफर बंद होण्याचा दिनांक – बुधवार, 28 मे 2025

· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक – प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बिडिंग तारीख बिड/ऑफर खुली होण्याच्या एक कामकाज दिवस आधीची म्हणजे शुक्रवार 23 मे 2025 आहे

· बोली किमान 34 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 34 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

· रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://www.jmfl.com/Common/getFile/4821

· संपूर्ण तपशीलांसाठी कृपया 21 मे 2025 रोजी Financial Express आणि Jansatta मध्ये प्रसिद्ध झालेली किंमत श्रेणी जाहिरात सुद्धा पहा.

लिंक: https://epaper.financialexpress.com/4011803/Mumbai/May-21-2025#page/26

राष्ट्रीय, 21 मे 2025: श्लॉस बेंगलोर लिमिटेड (“Company” किंवा “The Leela” हा ब्रँड) सोमवार, 26 मे 2025 रोजी प्रत्येकी 10 रु, दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी एकूण 35,000.00 दशलक्ष रु. (3,500 कोटी रु.) पर्यंतची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“Offer”) खुली करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.

या ऑफरमध्ये प्रोजेक्ट बॅले बंगलोर होल्डिंग्स (डीआयएफसी) प्रायव्हेट लिमिटेड (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) या विक्री समभागधारक यांच्याकडून 25,000 दशलक्ष रु. (2,500 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) आणि 10,000 दशलक्ष रु. (1,000 कोटी रु.) पर्यंतची विक्रीसाठीची ऑफर (“Offer for Sale”) समाविष्ट आहे.

ही ऑफर SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत ऑफरच्या किमान 75% पर्यंतचा भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. जर ऑफरपैकी किमान 75% हिस्सा QIBs (Qualified Institutional Buyers- पात्र संस्थात्मक खरेदीदार) ना वाटप करता आला नाही, तर संपूर्ण अर्ज रक्कम तात्काळ परत केली जाईल.

ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक भागाच्या दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. त्यासाठी पात्र बोली ऑफर किंमतीएवढी किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. प्रत्येक बिगर- संस्थात्मक गुंतवणूकदाराला (Non-Institutional Investor) वाटप किमान अर्ज आकारापेक्षा कमी नसावे. त्यासाठी बिगर- संस्थात्मक भागातील (Non-Institutional Portion) इक्विटी शेअर्सची उपलब्धता गरजेची आहे. उर्वरित उपलब्ध इक्विटी शेअर्स जर असतील तर ते सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार शेड्यूल XIII मध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून प्रमाणानुसार वाटप केले जातील. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वैध बोली ऑफर प्राईसच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक दराने प्राप्त झाल्यास, ऑफरपैकी जास्तीत जास्त 10% हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (“Retail Individual Investors” किंवा “RIIs”) (“Retail Portion”) उपलब्ध राहील. ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“NSE” आणि BSE सह एकत्रितपणे “Stock Exchanges”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित ऑफरसाठी एनएसई हे नामनिर्देशीत स्टॉक एक्सचेंज आहे.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे नाव आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments