Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाल पुस्तक जत्रेत शनिवारी आणि रविवारी खास कार्यक्रमांची मेजवानी

बाल पुस्तक जत्रेत शनिवारी आणि रविवारी खास कार्यक्रमांची मेजवानी

पुणे : खास लहान मुलांसाठी सुरू असलेली ‘ पुणे बाल पुस्तक जत्रा’ आता अंतिम टप्प्यात दाखल होत असून, शनिवार २४ मे आणि रविवार २५ मे हे दोन दिवस पुणेकरांसाठी आणि त्यांच्या लहानग्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात भरलेल्या या जत्रेमध्ये दोन्ही दिवस विविध शैक्षणिक, सर्जनशील आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ‘सलाम भारतीय वायुसैन्याला’ या सत्रात विज्ञान, विमानतंत्रज्ञान आणि वायुसैनिकांचे प्रात्यक्षिक यांचे प्रातिनिधित्व सदानंद काळे करणार आहेत. यानंतर दुपारी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजीव तांबे मुलांना ‘कथालेखन कसे करावे’ हे शिकवणार आहेत. सायंकाळी ‘चिंटू तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात चारुहास पंडित मुलांशी संवाद साधणार आहेत.

रविवारी कार्यक्रमांची सुरुवात ‘स्क्रीन टाईमचा राक्षस’ या परिसंवादाने होणार असून, डॉ. श्रुती पानसरे, सिमिता पाटील आणि अर्चना कुडतरकर यांचा त्यात सहभाग आहे. सायंकाळी चार वाजता प्रकाश पारखी ‘नकला नगरी’ घेऊन येणार आहेत. त्यानंतर ‘फुलपाखरू’ या पुस्तकाचे लेखक श्रीपाद ब्रह्मे यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे आणि शेवटच्या सत्रात ‘ड्रमसर्कल’चा जल्लोष अनुभवता येणार आहे.

मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, “आपल्या मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हा.” या जत्रेत सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, या जत्रेत पालक आणि मुलांना एकत्र आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments