मुंबई, फेब्रुवारी ८, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज भारतातील पहिल्या एएमटी सीएनजी कार्स – टियागो आणि टिगोर आयसीएनजी एएमटीच्या लाँचची घोषणा केली. २८.०६ किमी/तासच्या प्रभावी मायलेजसह या कार्स टियागो आयसीएनजीसाठी ₹ 7.89 लाख रूपये आणि टिगोर आयसीएनजीसाठी ₹ 8.84 लाख रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) या सुरूवातीच्या किमतींमध्ये उपलब्ध असतील. विद्यमान कलर पॅलेटमध्ये भर करत कंपनी टियागोमध्ये टोर्नेडो ब्ल्यू, टियागो एनआरजीमध्ये ग्रासलॅण्ड बेज आणि टिगोरमध्ये मेटेअर ब्राँझ या आकर्षक नवीन रंगांना सादर करणार आहे.
व्हेरिएण्टनुसार किंमत खालीलप्रमाणे:
उत्पादन
व्हेरिएण्ट्स सीएनजीमध्ये
किंमत रूपयांमध्ये (एक्स-शोरूम दिल्ली)
टियागो आयसीएनजी एएमटी
एक्सटीए
7,89,900
एक्सझेडए+
8,79,900
एक्सझेडए+ डीटी
8,89,900
एक्सझेडए एनआरजी
8,79,900
उत्पादन
व्हेरिएण्ट्स सीएनजीमध्ये
किंमत रूपयांमध्ये (एक्स-शोरूम दिल्ली)
टिगोर आयसीएनजी एएमटी
एक्सझेडए
8,84,900
एक्सझेडए+
9,54,900
या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. अमित कामत म्हणाले, ”व्यापक उपलब्धता आणि सुलभतेसाठी प्रसिद्ध सीएनजीला वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात स्वीकृती मिळाली आहे. टाटा मोटर्सने ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञान (बूट स्पेस कोणतीच तडजोड न करण्यास साह्य), उच्च स्तरीय वैशिष्ट्ये आणि थेट सीएनजीमध्ये स्टार्ट अशा विविध उद्योग अग्रणी वैशिष्ट्यांसह सीएनजी विभागात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. गेल्या २४ महिन्यांमध्ये आम्ही १.३ लाखांहून अधिक सीएनजी वेईकल्सची विक्री केली आहे. आकारमान वाढवण्याच्या आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही अभिमानाने भारतात एएमटीमधील पहिल्या एएमटी सीएनजी कार्स – टियागो आणि टिगोर आयसीएनजी लाँच करत आहोत.”
”टाटा मोटर्सचा व्यापक सीएनजी पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये टियागो, टिगोर, अल्ट्रोज आणि पंच यांचा समावेश आहे. सीएनजी बाजारपेठेतील अव्वल २ ब्रॅण्ड्सपैकी एक असण्यासह आम्ही मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सीएनजी विक्रीत ६७.९ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ पाहिली आहे. या इंटेलिजण्ट, सेफ व पॉवरफूल ट्विन्सच्या सादरीकरणासह आम्हाला या इंधन पर्यायासाठी मागणीमध्ये अधिक वाढ होण्याचा विश्वास आहे, परिणामत: प्रवासी कार्समधील आमची विकास गती कायम राहिल.”
उत्पादनाबाबत अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या टाटा मोटर्स अधिकृत डिलरशिपला किंवा कंपनीची वेबसाइट https://cars.tatamotors.com/ ला भेट द्या.


