पुणे,27 मे 2025 : जागतिक तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या लेनोवो ने आज आपला पूर्ण व्यावसायिक पोर्टफोलिओ प्रदर्शित करत स्मार्टर एंटरप्राईज परिवर्तनाला बळकटी देण्याची आपली वचनबध्दता दर्शविली. या कार्यक्रमात लेनोवोने एआय संचालित उपकरणांच्या थिंक पोर्टफोलिओ वर लक्ष्य केंद्रित करत यामध्ये नवीन थिंकपॅड एक्स9 14 ऑरा एडिशन यासह डिजिटल वर्कप्लेस सोल्युशन्स (डीडब्ल्यूएस),डिव्हाईस ॲज अ सर्व्हिस (डीएएएस),ट्रूस्केल व एआय चलित सोल्युशन समाविष्ट असलेले एंडटूएंड सेवा प्रदर्शित केल्या.
विकसित होत असलेल्या कार्यस्थळांसाठी अधिक स्मार्ट उपकरणे
लेनोवो थिंक पोर्टफोलिओ आपली कामगिरी,विश्वासार्हता आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत एंटरप्राईज कॉम्प्युटींगमध्ये प्रामुख्याने कार्यरत आहे.या कार्यक्रमात नवीन थिंकपॅड एक्स9 14 ऑरा एडिशन प्रदर्शित करण्यात आले.हे आधुनिक कामाच्या ठिकाणी एंटरप्राईज – ग्रेड वैशिष्टयांसह आणि स्मार्ट सिस्टिम व्यवस्थापन आणि सहकार्यासाठी एकात्मिक एआय समर्थनाच्या उद्देशाने बनवले गेले आहे.
शाश्वततेला समोर आणि केंद्रस्थानी ठेऊन नवीन थिंक डिव्हाईसेसमध्ये पुर्नवापर केलेले साहित्य, प्लास्टिकमुक्त एफएससी प्रमाणित पॅकेजिंग आणि उर्जा कार्यक्षम काँपोनंटसचे एकत्रीकरण असून लेनोवोच्या 2025 च्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
लेनोवो इंडियाच्या एंटरप्राईज बिझनेसचे कार्यकारी संचालक रोहित मीधा म्हणाले की,आजच्या कंपन्या विश्वासार्ह भागीदारांच्या शोधात आहेत.जे एआयचा वापर करण्यास,आयटी व्यवस्थापन सुलभ करण्यास आणि शाश्वत विकासाला चालना देण्यामध्ये मदत करू शकतील.लेनोवोमध्ये थिंकपॅड ऑरा सारखे एआय संचलित उपकरणे,अधिक स्मार्ट सेवा आणि व्यापक सोल्युशन्स समाविष्ट असलेला आमचा पूर्ण संच ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या एआय संदर्भातील गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.
लेनोवो सर्व्हिसेस – एंटरप्रायझेसना एंडटूएंड समर्थन
लेनोवोज् सोल्युशन्स ॲन्ड सर्व्हिसेस ग्रुप (एसएसजी) हे कंपन्यांना आयटी व्यवस्थापन सुलभ करण्यास आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल कार्यस्थळे विकसित करण्यामध्ये सक्षम करते. डिजिटल वर्कप्लेस सोल्युशन (डीडब्ल्यूएस) हा एक व्यवस्थापित सेवा संच असून रिमोट, हायब्रीड आणि ऑनसाईट कार्य परिसंस्थांना पाठबळ देतो.प्रमुख सेवांमध्ये डिव्हाईस लाईफ सायकल व्यवस्थापनासाठी डिव्हाईस ॲज अ सर्व्हिस (डीएएएस),स्केलेबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिससाठी ट्रूस्केल आणि वैयक्तिकृत तंत्रज्ञान साहाय्यासाठी प्रिमियर सपोर्ट प्लस यांचा समावेश आहे.लेनोवो डिव्हाईस इंटेलिजन्स प्लस आणि केअर ऑफ वन सारखी एआय युक्त साधने हे व्यवसायांना आयटी परिसंस्था अनुकूलित करण्यास आणि कर्मचाऱ्यांना चांगला अनुभव देण्यास व्यवसायांना मदत करते.
इमिशन ट्रॅकिंग आणि उत्सर्जनामध्ये कपात यासाठी एल.आय.एस.एस.ए सारख्या सोल्युशन्सद्वारे आणि थिंकशिल्ड एक्सडीआर (सेंटीनलवन द्वारे समर्थित) समाविष्ट असलेले इंटीग्रेटेड सुरक्षा संच तसेच फर्मवेअर लेव्हल व्हिजिब्लिटीसाठी ॲब्सोल्यूट आणि मायक्रोसॉफ्ट द्वारे समर्थित सायबर रेझिलियन्सी ॲज अ सर्व्हिस यांसह लेनोवो शाश्वतता आणि सुरक्षा उद्दिष्टांना पाठबळ देते.


