Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात 105 एकर वर साकारणाऱ्या एकात्मिक टाऊनशिप प्रकल्पात शाश्वततेसाठी हिरानंदानी कम्युनिटीज आणि...

पुण्यात 105 एकर वर साकारणाऱ्या एकात्मिक टाऊनशिप प्रकल्पात शाश्वततेसाठी हिरानंदानी कम्युनिटीज आणि क्रिसाला डेव्हलपर्सची टेरी बरोबर भागीदारी

पुणे, 27 मे 2025: शाश्वततेद्वारे शहरी जीवनमानाची पुर्नकल्पना करण्याच्या दिशेने हिरानंदानी कम्युनिटीज आणि क्रिसाला डेव्हलपर्स ने द एनर्जी ॲन्ड रिर्सोसेस इन्स्टिट्युट (टेरी) या संस्थेसोबत एक धोरणात्मक सामंजस्य करार केला आहे.नॉलेज पार्टनर म्हणून टेरीचा सहयोग हा पुण्यातील उष्ार हिंजवडी भागात साकारत असलेल्या 105 एकर एकात्मिक टाऊनशिपसाठी आहे.

ही भागीदारी म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, जिथे शाश्वतता,हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन आणि चांगले राहणीमान हे टाऊनशिपच्या नियोजन,विकास आणि अंमलबजावणीच्या केंद्रस्थानी ठेवले जात आहे. हिरानंदानी कम्युनिटीज आणि क्रिसाला डेव्हलपर्स हे संयुक्तपणे विकसित करत असलेली ही टाऊनशिप स्मार्ट शहरीकरण आणि शाश्वत पायाभूत सुविधांसाठी एक मापदंड म्हणून आधीच पाहिले जात आहे.
या सहकार्याचा भाग म्हणून,टेरी ही संस्था पर्यावरणीय उपाय योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन करेल.हे करत असताना इष्टतम हवा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स – एक्यूआय) ची पातळी राखणे आणि उच्च राहणीमचू निर्देशांक साध्य करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.या प्रकल्पाचे लक्ष्य आयजीबीसी ग्रीन टाऊनशिप प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त करणे असून यामुळे भारतातील सर्वात प्रगतशील निवासी परिसंस्थांपैकी एक बनेल.

याबाबत बोलताना क्रिसाला डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अगरवाल म्हणाले की,टेरीसोबतची ही भागीदारी केवळ लोकांना घर देणारी नाही तर त्यांची काळजी घेणारी अशी एकात्मिक टाऊनशिप विकसित करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.शाश्वतता हा आमच्यासाठी केवळ चर्चेत असलेला शब्द नसून हा प्रकल्पाचा पाया आहे.टेरीच्या कौशल्यासोबत हवेची गुणवत्ता,हिरवळ आणि जलसाठ्यांसारख्या नैसर्गिक शक्तींचे रक्षण करण्याबरोबरच आरोग्य,हवामान गुणवत्ता आणि दीर्घकालीन मुल्याच्या भविष्यातील अपेक्षा पूर्ण करणारी एक परिसंस्था देखील तयार करत आहोत.हे भारतातील आधुनिक व जबाबदारीने केलेला विकास कसा दिसावा यासाठी एक नवीन मानक स्थापित करण्याबद्दल आहे.

22 व 23 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत बांधकाम,एमईपी, लँडस्केपिंग आणि डिझाईन यांसारख्या विविध विषयावरील टीम्सने टेरीच्या तज्ञांसोबत संयुक्त सत्रांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.वायू प्रदूषण नियंत्रण, संसाधन कार्यक्षमता आणि इंटेलिजंट सस्टेनेबिलिटी ट्रॅकिंग सिस्टिम्सचे एकत्रीकरण यासाठी प्रमुख शिफारशींवर चर्चा करण्यात आली.

टेरीच्या शाश्वत पायाभूत सुविधा विभागाचे वरिष्ठ संचालक आणि ग्रीह कौन्सिलचे मुख्य कार्यकरी अधिकारी संजय शेठ म्हणाले की, हा एक योग्य वेळेत हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. टाऊनशिप डेव्हलपमेंटच्या केंद्रस्थानी हवेची गुणवत्ता आणि राहणीमानाचे मापदंड एकत्रित करून,हिरानंदानी कम्युनिटीज आणि क्रिसाला डेव्हलपर्स हे भविष्यातील रिअल इस्टेट कशी असेल हे दर्शवत आहेत.अनुपालनाच्या पलीकडे जाऊन दीर्घकालीन पर्यावरणीय आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रकल्पाशी जोडले जाणे याचा आम्हाला आनंद आहे.आमच्या भूमिकेत सल्लागार,देखरेख आणि क्षमता बांधणी याचा समावेश असेल,जेणे करून ही मानके साध्य होऊन राखली जातील.

या टाऊनशिपमध्ये बाहेरील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण,सूक्ष्म-हवामान नियोजन,ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा,बायोफिलिक लँडस्केपिंग,बांधकामादरम्यान धूळ उडू न देणे (डस्ट सप्रेशन) आणि पाणी व उर्जा कार्यक्षम प्रणाली यासारख्या दूरगामी पुढाकारांचा समावेश असेल.

या उपाययोजनांचा उह्ेश्य कार्बन फूटप्रिंट कमी करणे,आरोग्य राखणे आणि रहिवाशांना दीर्घकालीन खर्चात बचत साध्य करणे हे आहे.

नियोजनाच्या मुळामध्ये शाश्वतता अंर्तभूत करून हिरानंदानी – क्रिसालाची इंटिग्रेटेड टाऊनशिप केवळ पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतात हवामान लवचिकता तसेच राहण्यायोग्य शहरी विकासाचे प्रारूप बनण्यास सज्ज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments