Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडची आर्थिक वर्ष 2025 मध्ये ₹5,720 कोटींच्या उत्पन्नाची नोंद;...

ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडची आर्थिक वर्ष 2025 मध्ये ₹5,720 कोटींच्या उत्पन्नाची नोंद; चौथ्या तिमाहीतील स्थिर वाढ कायम

मुंबई, 28 मे 2025 : ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड या दक्षिण आशियातील आघाडीची एक्स्प्रेस एअर आणि एकत्रित वाहतूक व वितरण सेवा देणाऱ्या कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठीचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हे निकाल जाहीर करण्यात आले. भूराजकीय अनिश्चितता, व्यापक आर्थिक चढउतार आणि क्षेत्रीय आव्हानांना समोरगेलेल्या या आर्थिक वर्षात कंपनीने स्थिर कामगिरी केली असून, विविध बाजारपेठांमध्ये सेवा अखंड सुरू ठेवण्याची क्षमता आणि कार्यक्षमतेतील ठामपणा अधोरेखित केल आहे.
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ब्लू डार्टने आपल्या कामकाजातून ₹5,720 कोटींच्या उत्पन्नाची नोंद केली असून, करोत्तर नफा ₹245 कोटी इतका आहे. 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाहीत (Q4 FY25) कंपनीचे ऑपरेशनल उत्पन्न ₹1,417 कोटींवर राहिले, तर या कालावधीतील करोत्तर नफा ₹53 कोटी इतका नोंदविण्यात आला.
या घोषणेबाबत बोलताना ब्लू डार्ट एक्स्प्रेसचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनुअल म्हणाले, “आर्थिक वर्ष 2025 मध्ये आमचा भर सेवा गुणवत्तेची सातत्याने पूर्तता करण्यावर, आणि एव्हिएशन क्षमता व पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणुकीद्वारे आमच्या सेवा अधिक बळकट करण्यावर होता. हीच वाटचाल पुढेही कायम राहणार आहे. या गुंतवणुकींकडे आम्ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहत आहोत. त्यामुळे आमच्या मूलभूत क्षमता अधिक बळकट करणे, कार्यक्षमतेसाठी तंत्रज्ञान स्वीकारणे आणि विश्वासार्ह सेवा देणे, याबाबत आमची कटिबद्धता कायम आहे. यापैकी अनेक गुंतवणुका सुरुवातीच्या टप्प्यातच केल्या आहेत आणि येत्या काळात अपेक्षित असलेली व्यवसायवाढ खर्च नियंत्रित करण्यात मदत करेल, असा आमचा विश्वास आहे.
“आगामी आर्थिक वर्ष 2026 कडे पाहताना, सध्याच्या बाह्य अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सकारात्मक पण सावध दृष्टिकोन ठेवत आहोत. तरीही, आमचे नेटवर्क विस्तारणे, डिजिटल क्षमतांमध्ये प्रगती साधणे आणि शाश्वत उपक्रमांना चालना देणे या दिशेने ब्लू डार्टची गुंतवणूक सुरूच राहणार आहे. दीर्घकालीन कार्यक्षमता अधिक मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न सुरू ठेवले जातील, जे सेवा क्षमतांमध्ये वाढ, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणे आणि कामाकाजातील आव्हानांशी जुळवून घेत त्यावर मात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.”
गेल्या आर्थिक वर्षात ब्लू डार्टला ग्राहक सेवा, शाश्वतता, नियमांचे पालन आणि ब्रँडविषयक निष्ठा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आले. ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ म्हणून ओळख कायम राखत, ही कंपनी महिलांसाठी सर्वोत्तम कार्यसंस्था म्हणूनही नावाजली गेली. ग्राहक-केंद्रित कार्यसंस्कृती, लॉजिस्टिक्समधील कार्यक्षम कामगिरी आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून कंपनीला पुरस्कार मिळाले. तसेच, नियमपालनातील कठोर शिस्त आणि शाश्वत व्यवसाय दृष्टिकोनासाठीही ब्लू डार्टची प्रशंसा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments