भारतातील सर्वात मोठ्या सौंदर्य महोत्सवांपैकी एक असलेल्या या महोत्सवात खास ब्रँड अनावरणे, के-सौंदर्य उत्पादने, सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स सत्रे, लाइव्ह ट्युटोरियल्स आणि सर्वांगीण ब्रँड अनुभवांवर प्रकाश टाकला जाईल.
येत्या ६ आणि ७ जून रोजी मुंबईतील नेस्को येथे होणाऱ्या या महोत्सवात ख्यातनाम ब्रँड, जनरेशन झेड क्रिएटर्स एकत्र येतील आणि कोरियन ब्युटी ट्रेंडवर प्रकाश टाकतील.
या वेळी सहभागी होणाऱ्या काही प्रमुख ब्रँडमध्ये एचयूएल, पीएनजी, मिनिमलिस्ट, होनासा, मॅककॅफिन, हिमालय, बेला व्हिटा आणि इतरही अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.
फ्लिपकार्टचा इन-अॅप ग्लॅम अप सेल ६ ते १० जून दरम्यान देशभरातील खरेदीदारांना मर्यादित काळासाठी डील, नवीन लाँच आणि क्युरेटेड ब्युटी पिक्सची विशेष श्रेणी देईल.
३० मे २०२५: फ्लिपकार्टकडून भारतातील सर्वात मोठा सौंदर्य आणि लाइफस्टाइल उपक्रम असलेल्या ग्लॅम अप फेस्ट २०२५ च्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन ६ आणि ७ जून रोजी नेस्को, गोरेगाव, मुंबई येथे करणार आहे. हा कार्यक्रम दोन दिवस चालेल. त्यात देशभरातील ६,०००+ इन्फ्ल्युएन्सर्स आणि निर्मात्यांसह १००+ आघाडीचे ब्युटी, सौंदर्यप्रसाधने आणि के-ब्युटी ब्रँड सहभागी होतील. सौंदर्य, नावीन्यपूर्णता आणि कंटेंटचा एक दिमाखदार उत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ग्लॅम अप फेस्ट २०२५ के-ब्युटीमध्ये फ्लिपकार्टचे नेतृत्व मजबूत करतो. त्यात व्यापक ब्रँड अनुभव, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन आणि ग्राहक सक्रियता यांचा समावेश आहे.
या वेळी उपस्थितांना ब्रँड्सचे अनावरण, सर्वोत्तम के-ब्युटी उत्पादने, सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसर्सकडून सत्रे, लाइव्ह ट्यूटोरियल्स आणि सौंदर्यप्रेमी तसेच व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले इमर्सिव्ह ब्रँड झोन यांची विचारपूर्वक तयार केलेली रचना पाहायला मिळेल. या उपक्रमात नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित केले असून त्यामुळे फ्लिपकार्टच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज उपाययोजनांवर प्रकाश टाकला जाईल. त्यात एआय-संचालित त्वचा निदान, व्हर्च्युअल ट्राय-ऑन आणि लाइव्ह व्हिडिओ कॉमर्स यांचा समावेश आहे. त्यातून ग्राहकांच्या सौंदर्य उत्पादने शोधण्याच्या, त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आमला जाईल.
फ्लिपकार्टच्या एफएमसीजी आणि जनरल मर्चंडाईजच्या व्यवसाय प्रमुख मंजरी सिंघल म्हणाल्या, “भारतातील सर्वात मोठ्या सौंदर्य महोत्सव असलेल्या ग्लॅम अप फेस्ट २०२५ च्या तिसऱ्या आवृत्तीसह आम्ही भारतात सौंदर्याचा शोध, अनुभव आणि खरेदी यांना आकार देत आहोत. तंत्रज्ञान, विश्वास आणि आकांक्षा एकत्र आणणारा हा एकात्मिक, उत्तम दर्जाचा अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हा उपक्रम सौंदर्यप्रसाधने अधिक सुलभ बनवण्यासाठी के-ब्युटीसह नवनवीन ट्रेंड्स आणि आकर्षक अनुभव लाखो ग्राहकांपर्यंत आनंददायी पद्धतीने आणण्यासाठी आमची दृष्टी आणि सातत्यपूर्ण वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.”
या दोन दिवसांच्या महोत्सवात ग्लॅम अप फेस्ट २०२५ द्वारे कथाकथन, ब्रँड व ग्राहकांमधील मजबूत भागीदारी आणि प्रत्येकासाठी एक चांगला अनुभव मिळेल. या महोत्सवामुळे ग्राहक, निर्माते आणि माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सौंदर्य क्षेत्रात फ्लिपकार्टचे नेतृत्व आणखी मजबूत होईल. या महोत्सवानंतर ६ जून ते १० जून दरम्यान एक विशेष इन-अॅप ग्लॅम अप सेल आयोजित केला जाईल. त्यात देशभरातील फ्लिपकार्ट खरेदीदारांसाठी मर्यादित काळासाठी डील, उत्पादनांच्या सवलती आणि क्युरेटेड ब्युटी कलेक्शन्स उपलब्ध असतील.
फ्लिपकार्टकडून ग्लॅम अप फेस्ट २०२५ चे आयोजन सौंदर्य प्रसाधन व्यवहारातील भारताचे आवडते स्थान आणि के ब्युटीमधील नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न
RELATED ARTICLES


