पुणे, दि. 5 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) कम्प्यूटर एडेड इंटिरियर डिझाईनचा (संगणक प्रणालीच्या मदतीने अंतर्गत सजावट) चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
बीएनसीएच्या स्वयंपूर्ण अभ्यासक्रमाचे हे 26 वे वर्ष असून गेल्या दोन वर्षांपासून हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न करण्यात आला आहे. फक्त विद्यार्थिनींसाठीच असणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य, शास्त्र किंवा अन्य समकक्ष विद्याशाखांमध्ये 12वी उत्तीर्ण असण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रवेश घेण्यासाठी किमान 50 टक्के गुणांची गरज आहे. सध्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा चालू असून त्यासाठी एकंदर 60 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
बीएनसीएमध्ये या अभ्यासक्रमासाठी संगणकाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वूडवर्क लॅब, ॲडव्हान्स डिजिटल लॅब आणि इमर्सिव्ह डिझाईन लॅबच्या सुविधा उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रा. किरण निचळे – 9850546662


