Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedएअर इंडियाची दिल्ली-मनीला थेट विमानसेवा १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार ...

एअर इंडियाची दिल्ली-मनीला थेट विमानसेवा १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार · भारत आणि फिलीपिन्स या देशादरम्यान विमानसेवा देणारी एअर इंडिया ही एकमेव विमानसेवा कंपनी · प्रवाशांना एअर इंडियाच्या ए३२१ निओ या विमानातून आठवड्याला पाचवेळा उड्डाणे उपलब्ध होणार

गुरुग्राम ४ जून २०२५:. भारताची आघाडीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपनी एअर इंडियाने आज दिल्ली आणि फिलीपिन्स या देशाची राजधानी मनीला शहरांत थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली. ही विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरु होईल. भारत आणि फिलीपिन्स दरम्यान थेट विमानसेवा सुरु करणारी एअर इंडिया ही एकमेव विमानकंपनी ठरणार आहे. दिल्लीतून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार असून, यामुळे पर्यटन, व्यापास आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीला चालना मिळेल, असा विश्वास एअर इंडियाकंपनीकडून व्यक्त करण्यात आला. एअर इंडियाच्या या नवीन सेवेमुळे दोन देशांच्या राजधानी असलेल्या दिल्ली आणि मनीला या शहरांमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा पर्याय उपलब्ध होईल. या नव्या विमानसेवेमुळे भारत-फिलीपिन्स यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

दिल्लीतून फिलीपिन्स येथे आठवड्यातून पाचवेळा विमानसेवा उपलब्ध असेल. सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी प्रवाशांना दिल्लीतून फिलीपिन्स गाठता येईल. ही उड्डाणसेवा एअर इंडियाच्या एअरबस ए३२१निओ विमानातून केली जाईल. बिझनेस क्लास, प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी क्लास अशा तीन प्रकारच्या श्रेणी उपलब्ध असतील. प्रत्येक प्रवाशाच्या सोयीसाठी डिझाइन केलेल्या या वर्गवारीत प्रवाशांना आरामदायी सुखसोयी मिळतील. एअर इंडियाचे हे नवीन वेळापत्रक भारत आणि दक्षिण आशियातील संबंध अधिक मजबून करण्याच्या दृष्टने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

आता फिलिपिन्स सरकारने भारतीय पर्यटकांना दोन आठवड्यांसाठी व्हिसाशिवाय प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांना फिलिपिन्सच्या पर्यटन स्थळांना भेट देणे अधिक सुलभ आणि किफायतशीर ठरणार आहे. भारतीयांना दोन आठवड्यांत बोराकायच्या किना-यावरील शुभ्र वाळूवर विश्रांती घेणे, पलवानच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटणे, सेबू येथील ऐतिहासिक वारसास्थळांना भेट देणे आणि फिलिपिन्समधील विविध पर्यटन स्थळांना भेटी देणे आता सहज शक्य होणार आहे. हा निर्णय पर्यटनाला चालना देणारा असून, भारत-फिलिपिन्समधील सांस्कृतिक व पर्यटन संबंध अधिक बळकट होण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी दिल्ली आणि मनीला या नवीन विमानसेवेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, आम्हांला भारताला जगाच्या प्रत्येक टोकाशी जुळवायचे आहे. या उद्देशातूनच दिल्ली आणि मनीला विमानसेवा सुरु झाली आहे. भारतीय मोठ्या संख्येने परदेशवारी करु लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नोंदीत भारतीय पर्यटक परदेशवारीसाठी वारेमाप पैसा मोजत असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी फिलिपिन्सने भारतीय पर्यटकांसाठी लागू केलेल्या नवीन प्रवेश नियमांचा पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. एअर इंडिया या नवीन प्रवासाच्या संधी उपलब्ध करुन देत आहे. यामुळे भारत-फिलिपिन्स या दोन देशांतील सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होण्यास मदत होईल. नव्या एअर इंडिया जगभरातील अधिकाधिक प्रवाशांची जोडली जाईल, याचा आम्हांला आनंद आहे.

फिलिपीन्स ही बेटांची नगरी म्हणून ओळखली जाते. या देशाला ७ हजारांपेक्षा जास्त बेटांचा समूह लाभला आहे. या विशाल भौगोलिक निसर्गसंपन्नतेमुळे आणि प्राचीन-आधुनिक संस्कृतीच्या मेळाव्यात हा देश भारतीय पर्यटकांना सहज आकर्षित करु शकतो. भारतीय पर्यटकांची वाढती आवक लक्षात घेता, एअर इंडियाने नुकतीच भारत आणि फिलिपीन्सदरयान ही विमानसेवा सुरु केली आहे. या नव्या मार्गामुळे दोन्ही देशांतील पर्यटन आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट होतील, असा विश्वास एअर इंडियाकडून व्यक्त करण्यात आला. फिलिपीन्स व भारत यांच्यातील व्यापारही मोठ्या प्रमाणावर वाढत असून, २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ३.५३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. ही आकडेवारी २०१५-१६ मधील १.८९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे, अशी माहिती मनिलास्थित भारतीय दूतावासाने दिली. हा सकारात्मक बदल केवळ व्यापारापूरताच मर्यादित नसून, पर्यटन, संस्कृती, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रांमध्येही वाढून दोन्ही देशांमधील संबंध अधिक सक्षम होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ही विमानसेवा भारतातून थेट प्रवासाची सुविधा देईल. तसेच युरोपमधून दिल्लीमार्गे मनिला या शहराला जुळवून देईल. केवळ भारतातीलच नव्हे तर युरोपातील प्रवाशांसाठीदेखील आता मनिलाला जाणे अधिक सोयीचे, जलद आणि सुटसुटीत ठरणार आहे. एअर इंडियाची ही नवीन विमानसेवा पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी मनिलाला जाणा-या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

दिल्ली ते मनिला विमानसेवेचे वेळापत्रक
( ही सेवा येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होईल )

उड्डाण क्रमांक

Sector

निर्गमन

आगमन

या दिवशी उड्डाणे उपलब्ध असतील

AI2362

दिल्ली-मनिला

दुपारी १ वा. २० मि.

रात्री १० वा. ४० मि.

सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार

AI2361

मनिला-दिल्ली

रात्री ११वा.४० मि.

दु. ३ वा. ५० मि.+1

सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार

या वेळापत्रकात दिलेल्या सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार आहेत. .+1 असा उल्लेख असल्यास, संबंधित सेवेचे आगमन हे दुस-या दिवशी होणार असल्याचे दर्शवते.

दिल्ली आणि मनीला या मार्गावर सुरु होणा-या विमानसेवेसाठी एअर इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल एप्लिकेशन, एअरपोर्ट तिकीट कार्यालय, संपर्क केंद्र तसेच सर्व ट्रॅव्हल एजंट्सकडे बुकिंगसुविधा उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments