Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedकसब्यात प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदनउटी सोहळा श्री बहिरोबा देव...

कसब्यात प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदनउटी सोहळा श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन

पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदनउटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करून मंदिर सुशोभित करण्यात आले. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे मंदिरात चंदन उटी सोहळा आणि मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. अखिल भारतीय वारकरी संप्रदाय तर्फे भजन कीर्तनाचा कार्यक्रम देखील यानिमित्ताने मंदिरात पार पडला.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदन उटी सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments