राष्ट्रीय | ४ जून २५: अविवा इंडियाने आपल्या आर्थिक वर्ष २५ साठी आर्थिक निकालांची घोषणा केली असून स्थिर प्रगती व शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित केल्याचे यातून दिसते. या वर्षात फक्त संख्यात्मक प्रगतीवर भर दिला गेला नाही तर व्याप्ती खोलवर रूजवण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक निर्णय एका उद्देशाने घेतला गेला. प्रत्येक निष्कर्ष दीर्घकालीन मूल्याशी जोडला गेला होता. आर्थिक वर्ष २४ मध्ये रचलेल्या पायावर उभारणी करताना अविवाने अधिक स्मार्ट उत्पादने, उत्तम अंमलबजावणी आणि भारतभरातील ग्राहकांसोबत सखोल भावनिक संपर्क यांच्याद्वारे पाया मजबूत केला आहे.
अविवाचा ग्रॉस रिटन प्रीमियम १३०७ कोटी रूपये इतका स्थिर होता आणि त्यांनी वितरणकेंद्रित मॉडेलऐवजी अधिक उत्पादनकेंद्रित आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाकडे वाटचाल केली. तो सातत्य, विनाप्रतिबंध वाढ आणि कार्यान्वयन कार्यक्षमतांवर आधारित होता. हे परिवर्तन सुधारित क्लेम सेटलमेंट अनुभवांमध्ये प्रतिबिंबित झाले असून प्रति १०,००० पॉलिसींमागे तक्रारींमध्ये घट आणि आरोग्य आणि कल्याण उपक्रमांचे परिणाम वाढल्याचे दिसले आहे.
अविवा इंडियाने ३० दिवसांच्या आत १००% क्लेम सेटलमेंटमध्ये सर्वांत कमी कालावधीची नोंद केली आहे. आम्ही ९९.२५% क्लेम सेटल करून उद्योगात सर्वोत्तम कामगिरी केल्याचे दिसते. कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये २० वरून आर्थिक वर्ष २५ मध्ये १६ पर्यंत दर १०,००० पॉलिसींमागे तक्रारींमध्ये घट नोंदवली आहे. त्यातून वितरण आणि क्लेम्सच्या अनुभवातील प्रगती दर्शवते.
अविवा आपल्या ऑफरमध्ये सुदृढ आरोग्याचा समावेश करून लाइफ इन्शुरन्सची व्याख्या नव्याने करत आहे. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य, सक्रिय आरोग्य तपासणी, पोषण आणि आर्थिक सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून अविवा उत्तम जीवनशैलीला प्रोत्साहन देते. सिग्नेचर ३डी टर्म प्लॅन – प्लॅटिनमद्वारे देण्यात आलेल्या प्रिव्हेंटिव्ह वेलनेस पॅकेजमध्ये स्मार्टवॉच, स्मार्ट स्केल, बीपी मॉनिटर, एआय-चलित पोषण सल्ला आणि अनुवंशिक चाचणी असलेले वेलनेस किट समाविष्ट आहेत. ते ग्राहकांना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम करतात.
अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) १४,७३५ कोटी रुपयांपर्यंत वाढली. त्यात ६% वाढ नोंदवली असून त्यातून गुंतवणूकदारांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण फंड परफॉर्मन्स दिसून येतो. परंतु या वेळी अधोरेखित झालेली बाब केवळ वाढ नव्हती, तर शाश्वतता होती.
दीर्घकालीन ग्राहकांच्या विश्वासाचे प्रमुख सूचक असलेला १३ व्या महिन्याचा पर्सिस्टन्सी रेट आर्थिक वर्ष २५ मध्ये ७३% पर्यंत वाढला. त्यातून ग्राहकांशी अधिक मजबूत संबंध आणि अल्पकालीन विजयांपेक्षा शाश्वत मूल्यावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जातो.
कंपनीने मागील वर्षी ८९.६६ कोटी रुपयांवरून १०७.५२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आणि सॉल्व्हन्सी रेशो १९३% पर्यंत सुधारला – या दोन्ही गोष्टी निरोगी, स्थिर आर्थिक पाया दर्शवितात. कंपनीचे निव्वळ मूल्य १४% ने वाढले. त्यामुळे अविवाला भविष्यात नवनवीन उपक्रम आणि गुंतवणूक करण्यासाठी अधिक क्षमता मिळाली.
आर्थिक वर्ष २५ मधील यश आणि व्यावसायिक कामगिरीबद्दल आपले विचार मांडताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असित रथ म्हणाले की, “आर्थिक वर्ष २५ हे अर्थपूर्ण प्रगती आणि उद्देशाच्या स्पष्टतेचे वर्ष आहे. आम्ही ग्राहकांच्या गरजांवर आमचे लक्ष केंद्रित केले आहे. वेगाने नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत आणि भागधारकांनाही सातत्यपूर्ण मूल्य प्रदान केले आहे.”
“उत्पादन पोर्टफोलिओमधील आमचा वाढता वाटा, सुधारित ऑपरेशनल रेशो आणि नवनवीन उपक्रमांबाबतचा दृष्टिकोन आम्हाला भविष्यासाठी सक्षम बनवतात. आमच्यासाठी सर्वाधिक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे पुढचा प्रवास जिथे विमा प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी अधिक समावेशक, सुसंगत आणि सुलभ बनतो. कमी दरातील ऑफरसह विशिष्ट जीवन टप्प्यांसाठी आणि आरोग्याच्या स्थितीनुसार तयार केलेल्या आगामी अनावरणासह आम्ही लोकांच्या जीवनात विम्याच्या भूमिकेची नव्याने कल्पना करत आहोत. या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून आमचे आरोग्य आणि कल्याण उपक्रम जसे प्रिव्हेंटिव्ह वेलनेस पॅकेज, ग्राहकांना त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यास सक्षम करत आहेत. विमा केवळ प्रतिबंधात्मक नाही तर सक्रिय जीवन जगण्यासाठी आहे असे आम्हाला वाटते,” रथ पुढे म्हणतात.
पुढे जाताना
ब्रँडसाठी पुढचा मार्ग आणखी रोमांचक आहे. ब्रँडची सुदृढतेला आर्थिक सुरक्षेचा मध्यवर्ती भाग मानणारी एक नवी ओळख निर्माण होते आहे. अविवाचे आगामी उत्पादन अनावरण फक्त आकर्षकच नाहीत तर ते दैनंदिन जीवनासाठी डिझाइन केलेले आहेत – ते परवडणारे, सुलभ आणि लाखो भारतीयांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी जोडले जाणारे आहेत.
अविवा लाइफ इन्शुरन्स इंडियाबाबत
अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड ही डाबर इन्व्हेस्ट कॉर्प आणि अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड या १६९६ पासून अस्तित्वात असलेल्या यूकेमधील विमा समूह यांचा संयुक्त उपक्रम आहे. अविवा लाईफ इन्शुरन्स इंडिया नाविन्यपूर्ण विमा उपाय आणि ग्राहककेंद्री उपक्रमांद्वारे आपल्या ग्राहकांचे आर्थिक कल्याण वाढवण्यासाठी समर्पित आहे.
वेबसाइट: www.avivaindia.com
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:
अपूर्वा निझरा | Apoorva.Nijhara@avivaindia.com | +918291446320
कोपल जैन| kopal.jain@edelman.com | +91 8109352502
श्रेण्या प्रियदर्शनी | shrenya.priyadarshini@edelman.com | +91 7021073983


