अबु धाबी, युएई – एतिहाद एअरवेज या संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय विमानसेवेला चेन्नई सुपर किंग्जसाठी अधिकृत प्रायोजक म्हणून उत्साहवर्धक नवीन व्हेंचरची घोषणा करताना आनंद होत आहे. सीएसकेची होम सिटी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारोहादरम्यान या सहयोगाची घोषणा करण्यात आली.
२,००० उत्साही चाहत्यांच्या उपस्थितीत कलैवनार अरंगम येथे ‘अनावरण इव्हेण्ट’चे आयोजन करण्यात आले. यावेळी टीममधील ऑफिशियल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू देखील उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत मंचावर एतिहाद टीम देखील होती, जेथे खेळाडूंनी विमानसेवेचा लोगो असलेली नवीन जर्सी परिधान केली होती.
या सहयोगाचा भाग म्हणून एतिहादचा आगामी संपूर्ण सीझनदरम्यान उत्साहवर्धक क्रियाकलाप, प्रमोशन्स आणि अद्वितीय उपक्रमांमध्ये चाहत्यांना समाविष्ट करत त्यांचा अनुभव उत्साहित करण्याचा मनसुबा आहे. चाहते एतिहादसह उत्साहवर्धक प्रवासाची अपेक्षा करू शकतात, जेथे ते चेन्नई सुपर किंग्जला विजयाच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये पाठिंबा देतील.
एतिहादसोबतचा सहयोग चेन्नई सुपर किंग्जचे इव्हेण्ट्स व व्यासपीठांसह सुरू होईल, जेथे एतिहादचा लोगो चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीच्या मागील बाजूस पाहायला मिळेल. इव्हेण्ट्स व सामन्यांदरम्यान सर्वसमावेशक व धमाल क्रियाकलापांचे आयोजन करण्यात येईल, तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना विशेष डील्स प्रदान करण्यात येतील.
एतिहाद एअरवेजचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर आरिक डे या सहयोगाबाबत आपला उत्साह व्यक्त करत म्हणाले, ”आजचा क्षण असाधारण प्रवासाची सुरूवात आहे, जेथे आम्ही आमच्या क्रीडा पोर्टफोलिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे स्वागत करतो. जागतिक स्तरावर क्रिकेट विविध समुदायांना एकत्र आणते, ज्यामधून एतिहाद आणि चेन्नई सुपर किंग्जची संयुक्त मूल्ये दिसून येतात. आमचा सहयोग प्रायोजकत्वापलीकडे देखील आहे, हे संयुक्त तत्त्वांचे साजरीकरण आहे, जेथे एतिहाद आणि चेन्नई सुपर किंग्जचा सहयोगात्मक उत्साह दिसून येतो.
”भारतात क्रिकेट अविश्वसनीय आहे आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनी या अविश्वसनीय देशामधील क्रिकेटप्रती खरे प्रेम व आवड दाखवली आहे. एतिहादमध्ये आमचा समान पॅशनच्या माध्यमतून प्रवाशांसोबत दृढ संबंध निर्माण करण्यावर विश्वास आहे, तसेच ‘यलो आर्मी’प्रमाणे आमचा या टीमवर देखील विश्वास आहे. आम्ही या रोमांचक प्रवासाला सुरूवात करत असताना चाहते व प्रवाशांसाठी संस्मरणीय क्षणांची निर्मिती करण्यासह प्रबळ संबंध प्रस्थापित होण्याची अपेक्षा करतो, जे सीमांपलीकडे देखील जातात आणि खेळाच्या उत्साहाला नव्या उंचीवर घेऊन जातात.”
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले, ”आम्ही एतिहाद एअरवेजसोबत सहयोग केला आहे. या विमानसेवेची आमच्यासारखीच मूल्ये, सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धता आणि यशाची आवड आहे. तसेच या सहयोगामधून मिळणारे फायदे आमच्या ब्रॅण्डसाठी मूलत: जागतिक आहेत. हा सहयोग पारंपारिक प्रायोजकत्वाच्या मर्यादांपलीकडे जात आमच्या चाहत्यांसाठी असाधारण अनुभवाची निर्मिती करतो आणि क्रीडा भागीदाऱ्यांमध्ये नवीन मानके स्थापित करतो.”
”एतिहाद – चेन्नई सुपर किंग्ज सहयोग संपूर्ण क्रिकेट सीझनदरम्यान उत्साहवर्धक उपक्रम, सर्वसमावेशक क्रियाकलाप आणि चाहत्यांना अद्वितीय अनुभवाची खात्री देतो. आमच्याशी संलग्न राहा, जेथे आम्ही क्रीडा प्रायोजकत्वाच्या गतीशीलता नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा आणि जागतिक स्तरावर अतूट छाप निर्माण करण्याचा प्रवास सुरू करत आहोत.”
हा धोरणात्मक सहयोग एतिहादची भारतीय बाजारपेठेप्रती कटिबद्धता आणि भारतातील विविध समुदायांसोबत अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याप्रती समर्पिततेला अधिक दृढ करतो. हा सहयोग एतिहादचे जागतिक दर्जाचे प्रवास अनुभव आणि चेन्नई सुपर किंग्जच्या क्षमतेला एकत्र आणतो, ज्यामधून विजयी संयोजन निर्माण होते, जे चाहते व प्रवाशांसाठी संलग्न असेल.
एतिहाद भारतातील १० शहरांना एकूण १६५ साप्ताहिक फ्लाइट्सची सेवा देते, ज्यामुळे भारतातील प्रवासी जगभरातील ७० हून अधिक गंतव्यांशी कनेक्ट होतात. नुकतेच, विमानसेवेने कोझीकोडे आणि तिरूवनंतपुरमकरिता दोन नवीन मार्गांची सुरूवात केली आणि प्रतिदिन दोन फ्लाइट्स ते चार फ्लाइट्ससह मुंबई व दिल्लीकरिता वारंवारतेमध्ये वाढ देखील केली.
एतिहाद – चेन्नई सुपर किंग्ज सहयोग एतिहादने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड सुपरस्टार कतरिना कैफची घोषणा केल्यानंतर करण्यात आली आहे. क्रिकेटिंग क्षमता आणि बॉलिवुड ग्लॅमरचे हे डायनॅमिक संयोजन एतिहादचा भारतातील विविध ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्याप्रती कटिबद्धतेला अधिक दृढ करते.


