Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजगुरुनगर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राजगुरुनगर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १० : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे या संस्थेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, इच्छुक मुलींना प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थींनींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीला अधीन राहून रिक्त जागांवर वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहेत.

शासकीय वसतिगृहात कमाल ७५ विद्यार्थींनींना प्रवेश दिला जाणार असून, प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत भोजन व निवासाची व्यवस्था असून, शैक्षणिक साहित्य, अंथरुण-पांघरुन व दरमहा खर्चासाठी मुलींना प्रत्येकी ५००/- रुपये प्रमाणे निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी १००/- रुपये अदा करण्यात येतात. शिवाय विद्यार्थीनींकरीता संगणक कक्ष, अद्यावत ग्रंथालय आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत.

वसतिगृह प्रवेशासाठी सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ११ जून २०२५ पासून होणार असून, https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गृहपाल बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल श्री. पी. व्ही. आंबले यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments