अहमदाबाद, 13 जून 2025: भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स कंपनीने 12 जून 2025 रोजी अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्रभावित झालेल्या कुटुंबीयांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, कंपनीने आपले पॉलिसीधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी विशेष उपाययोजना सक्रिय केल्या आहेत.
या कठीण प्रसंगी प्रभावित पॉलिसीधारकांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या अडचणींची जाणीव ठेवत, बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने मृत्यू आणि अपंगत्व दाव्यांच्या तातडीने कार्यवाहीसाठी एक विशेष क्लेम सेटलमेंट डेस्क स्थापन केला आहे. या क्लेम्सची प्रक्रिया तातडीने पूर्ण होण्यासाठी एक जलद व सुलभ प्रणाली लागू करण्यात आली आहे, जेणेकरून पॉलिसीधारकांचे दावे त्वरित निकाली निघतील.
प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्सने नामनिर्देशित व्यक्ती, कायदेशीर वारसदार किंवा पॉलिसीधारक यांनी क्लेम प्रक्रिया सुरू करण्यासाठी सादर करावयाची किमान कागदपत्रे स्पष्टपणे नमूद केली आहेत. मृत्यू प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध नसेल, तर महापालिका प्राधिकरण किंवा रुग्णालयाकडून जारी केलेले प्रमाणपत्र देखील क्लेम प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्वीकारले जाईल. यासोबत नामनिर्देशित व्यक्तीचे KYC दस्तऐवज आणि बँक मँडेट सादर करणे आवश्यक आहे. क्लेमची नोंद खालीलपैकी कोणत्याही सोयीस्कर माध्यमातून करता येईल आणि त्यासाठी संबंधित माहिती सादर करता येईल:
● कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा: 1800-209-7272
● देशभरातील 596 शाखांपैकी आपल्या जवळच्या कोणत्याही शाखेला भेट द्या
● खालील ईमेल आयडीवर मेल पाठवा : claims@bajajallianz.co.in
बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स कठीण प्रसंगी आपल्या पॉलिसीधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि अहमदाबादमधील दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना त्वरित सहाय्य पुरवण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवणार आहे.


