Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedफायब आणि मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेसची भागीदारी – आता नोकरदारांना मिळणार सोपं...

फायब आणि मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेसची भागीदारी – आता नोकरदारांना मिळणार सोपं वैयक्तिक कर्ज*

*
मुंबई, १६ जून, २०२५ – भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी फायब आणि मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी भागीदारी केली असून, यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांपर्यंत वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) ची सुविधा पोहोचणार आहे. ही भागीदारी विशेषतः मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे, जे डिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतील.

या भागीदारीअंतर्गत नोकरदार व्यक्तींना ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त ₹५,००,००० (पाच लाख रुपये) पर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकेल. फायबची मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेससोबतची भागीदारी भारतभरातील आपली उपस्थिती अधिक बळकट करेल आणि स्पर्धात्मक व्याजदरांवर व्यापक ग्राहकवर्गाला कर्जाची सुविधा उपलब्ध करून देईल.

फायबचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री अक्षय मेहरोत्रा म्हणाले, “मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेससोबतची ही भागीदारी आमच्या को-लेंडिंग प्लॅटफॉर्मला बळकट करेल; यामुळे आम्ही अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू आणि देशभरात आर्थिक समावेशनाला चालना देऊ. आजचे तरुण झपाट्याने मोबाईल अॅप्सवर आधारित आर्थिक सेवांकडे वळत आहेत – अशा काळात ही भागीदारी अगदी योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.”
या भागीदारीमुळे ग्राहकांना जलद, सुलभ आणि लवचिक पद्धतीने वैयक्तिक कर्ज उपलब्ध होणार आहे, जे त्यांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करण्यात मदत करेल.

मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री कृष्ण कन्हैया म्हणाले,“फायबसारख्या आघाडीच्या फिनटेक कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आम्हाला व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचता येईल आणि त्यांना सोपा, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल कर्ज अनुभव मिळवून देता येईल. ही भागीदारी आमच्या कर्जपुस्तकाला बळकटी देण्यास आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.”

मिरे ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेसने अलीकडेच पर्सनल लोन विभागात पाऊल ठेवले असून, या क्षेत्रात मजबूत पोर्टफोलिओ तयार करून ग्राहकांना एक सुलभ आणि विश्वासार्ह अनुभव देण्याचा उद्देश कंपनीचा आहे.

आजवर फायबने ३ कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा दिली असून, १८ शहरांपुरती मर्यादित असलेली त्यांची सेवा आता ३५० पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचली आहे. भारतातील मोठ्या शहरांसह लहान शहरांमधील व गावांमधील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे – हा फायबचा प्रमुख उद्देश आहे, आणि त्याच दिशेने ही भागीदारी एक मोठे पाऊल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments