Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर व्यापारी एकता दिनानिमित्त...

स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त व्यापा-यांच्या कार्याच्या गौरव करणा-या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी सभागृहात हा समारंभ होणार आह. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे असणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय राठी, सचिव किशोर पिरगळ, खजिनदार मोहन कुडचे, तसेच पदाधिकारी सूर्यकांत पाठक, दिलीप कुंभोजकर, अरविंद पटवर्धन, सुरेश नेऊरगांवकर, मदनसिंह राजपूत, नितीन पंडीत, किशोर चांडक, अनिल प्रभुणे, धनंजय रामलिंगे, राजकुमार गोयल, सुनिल शिगवी, मनिष परदेशी, राजेश गांधी आदी उपस्थित होते.

सचिन जोशी म्हणाले, असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा मार्केटयार्डमधील राजेंद्र कुमार मोहनलाल आणि कंपनीचे राजेंद्र बांठिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल तिरंगा चे चंद्रकांत आदमाने, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार लक्ष्मी रस्त्यावरील जनता खादी भांडारचे श्रीनिवास शाम जन्नू, फिनिक्स पुरस्कार तुळशीबागेतील अमृता कलेक्शनचे किरण चौहान आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार लक्ष्मी रस्त्यावरील त्रिंबक मोरेश्वर आणि कंपनीच्या सुनिता गोंधळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार नारायण पेठेतील चाय दरबारच्या ऐश्वर्या शेलार आणि कांचन जांभळे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे असणार आहेत. तर, आमदार हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्काराचे यंदा २८ वे वर्ष आहे. दरवर्षी २५ मे या व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणा-या असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापाºयांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

दुकानातील स्वच्छता, सादरीकरण, आधुनिकता आणि ग्राहकांशी संबंध आदी गोष्टी पाहिल्या जातात. तसेच व्यापा-यांच्या उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थींची निवड समितीतर्फे केली जाते. यापूर्वी गिरीकंद ट्रॅव्हल्स चे विश्वास जोशी, गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला, दोराबजी अ‍ँड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फरशिद पटेल, कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे कृष्णचंद्र्रजी आर्य (करमचंदानी), लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर ट्रेडिंग कंपनीचे चकोर गांधी, जयराज ग्रुपचे राजेश शहा, बेकलाईट कंपनीचे सचिन शामसुंदर मालपाणी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदींना व्यापारभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. व्यवसायातून सामाजिक योगदान आणि उत्कृष्ठतेचा प्रवास अधोरेखित करणा-या या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून व्यवसाय क्षेत्रातील प्रेरणादायी कायार्चा साक्षीदार व्हावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments