Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedवारक-यांसाठी ८ कीर्तनांची सलग १२ तास अखंड कीर्तनमाला तपपूर्ती सोहळा*  ...

वारक-यांसाठी ८ कीर्तनांची सलग १२ तास अखंड कीर्तनमाला तपपूर्ती सोहळा*   *शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी च्या वतीने लाल महाल येथे आयोजन* 

 

 

पुणे : वारकरी सांप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचावत विठुरायाच्या भेटीसाठी कित्येक मैल चालत जाणा-या वारक-यांच्या स्वागतासाठी पुण्यात ८ कीर्तनांच्या सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या नामघोषाने ऐतिहासिक लालमहालाचा परिसर दुमदुमून गेला. कसबा पेठेतील लालमहाल येथे आयोजित कीर्तनमालेला वारकरी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे वै. ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी यांच्या स्मरणार्थ सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते, अखंड कीर्तनमालेचे हे बारावे वर्ष अर्थात तपपूर्ती सोहळा आहे. कीर्तनमालेचे उद्घाटन लालमहालाचे सुरक्षा रक्षक संजय आंबवले यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी व गाथेचे पूजन करून झाले. यावेळी आयोजक प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष सीए जर्नादन रणदिवे आदी उपस्थित होते.

 

कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर, वासुदेवबुवा बुरसे, वत्सलाताई शिर्के, शिवार्चनाताई कुलकर्णी, विकासाबुवा दिग्रजकर, संगीताताई मावळे, सुहासबुवा देशपांडे आणि शेखरबुवा व्यास यांनी कीर्तने केली. संतपरंपरेचे महत्व आणि महात्म्य कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. केदार टिकेकर, सिद्धार्थ कुंभोजकर (तबला), पल्लवी पिळणकर, होनराज मावळे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

 

आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, हजारो वारकरी, दिंडीप्रमुख या कीर्तनमालेचा आनंद घेण्याकरीता लालमहालात येतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. त्यावेळी प्रबोधिनीतर्फे वेगळ्या प्रकारे वारक-यांचे स्वागत करीत त्यांना नारदीय कीर्तनाचा आनंद देण्याचा प्रयत्न कीर्तनमालेच्या माध्यमातून सलग १२ वर्ष केला जातो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments