Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedफर्ग्युसन महाविद्यालयात योगशिक्षकांच्या प्रशिक्षणाशी संबंधित नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार

फर्ग्युसन महाविद्यालयात योगशिक्षकांच्या प्रशिक्षणाशी संबंधित नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार

पुणे – फर्ग्युसन महाविद्यालयात योगशिक्षकांच्या प्रशिक्षणाशी संबंधित नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांनी दिली आहे. हा अभ्यासक्रम पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) अशा स्वरूपाचा आहे.

 

योगशिक्षक होण्यासाठी आवश्यक सर्व घटकांचे सखोल शिक्षण या अभ्यासक्रमाच्या माध्यमामधून देण्यात येणार आहे. भारतीय तत्त्वज्ञान व योगशिक्षणाचा सखोल अभ्यास याबरोबरच यासंदर्भातील प्रात्यक्षिकांवर भर देण्यात असल्याची माहिती या अभ्यासक्रमाच्या संयोजक व उपप्राचार्य डॉ . राधिका जाधव यांनी यावेळी दिली. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून तो आठवड्यातील तीन दिवस संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत महाविद्यालय प्रांगणात चालविण्यात येईल.

 

या अभ्यासक्रमामध्ये शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान तसेच आयुर्वेदामधील महत्त्वपूर्ण भाग शिकविण्यात येईल. याचबरोबर, योगशिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेले संवाद कौशल्य व इतर घटकांचाही त्यामध्ये समावेश असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments