बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणारी ओपन-एंडेड इक्विटी योजना
· ही योजना 27 जून 2025 रोजी सुरू होऊन 11 जुलै 2025 रोजी बंद होईल आणि 21 जुलै 2025 पासून सतत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा सुरू होईल
मुंबई, 26 जून 2025: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (“महिंद्रा फायनान्स”) आणि मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट (सिंगापूर) प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने महिंद्रा मॅन्युलाइफ बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड सादर केला आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वाढ प्रदान करणे हा या ओपन-एंडेड इक्विटी योजनेचा उद्देश आहे.
भारताचे बीएफएसआय क्षेत्र मजबूत विस्तारासाठी सज्ज असताना, वाढते वित्तीयकरण, डिजिटल अवलंब, दरडोई उत्पन्न वाढ आणि सहाय्यक नियामक वातावरण यासारख्या दीर्घकालीन संरचनात्मक बदलांचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा फंड करतो. ही योजना गुंतवणूकदारांना बँकिंग, विमा, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, ब्रोकिंग, फिनटेक यासह इतर वित्तीय सेवांमध्ये होणाऱ्या या क्षेत्राच्या वाढीमध्ये सहभागी होण्याची संधी देते.
“भारताच्या आर्थिक उत्क्रांतीत बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे,” असे महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे एमडी आणि सीईओ अँथनी हेरेडिया म्हणाले. “जसजशी अर्थव्यवस्था घडत जाते आणि वित्तीय समावेशन अधिक खोलवर होते, तसतसे हे क्षेत्र दीर्घकालीन संरचनात्मक संधी सादर करते. आमचा बँकिंग आणि वित्तीय सेवा फंड शिस्तबद्ध, अभ्यास करून मग गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनासह या क्षमतेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”
महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे सीआयओ – इक्विटी, कृष्णा संघवी म्हणाले, “बँकिंग हा भारतीय आर्थिक क्षेत्राचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, परंतु मिळणारी संधी ही त्याही पलीकडे जाते. या फंडाचे उद्दिष्ट एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे आहे जे बँका आणि विमा कंपन्यांसारख्या पारंपरिक नेतृत्वापासून ते भारतात बचत कशी केली जाते, कर्जाची पद्धती काय, गुंतवणूक कशी करतो, व्यवहार कसे होतात, यात नवोपक्रम चालवणाऱ्या उदयोन्मुख उमेदवारापर्यंत बीएफएसआय इकोसिस्टमची मूलभूत गोष्टी आणि मूल्यांकनांवर शिस्तबद्ध लक्ष केंद्रित करत पूर्ण माहिती मिळवतो.”
भारतातील बाजार भांडवलाच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त वाटा वित्तीय सेवा क्षेत्राचा असल्याने तसेच कॉर्पोरेट नफ्यात वाटा वाढता असल्याने, विमा, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, फिनटेक आणि डिजिटल ब्रोकिंग या सारख्या कमी व्याप्ती असलेल्या क्षेत्रांमधील समोर येणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी हा फंड तयार आहे.
नवीन फंड ऑफर (NFO) कालावधी 27 जून 2025 रोजी सुरू होईल आणि 11 जुलै 2025 रोजी बंद होईल. ही योजना 21 जुलै 2025पासून सतत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा सुरू केली जा
* हे उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल शंका असल्यास गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
# या फंडासाठी नियुक्त केलेले उत्पादन लेबलिंग / जोखीम पातळी नवीन फंड ऑफर दरम्यान फंडाच्या वैशिष्ट्यांच्या किंवा मॉडेल पोर्टफोलिओच्या अंतर्गत मूल्यांकनावर आधारित असते आणि नवीन फंड ऑफरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यावर ते बदलू शकते.
म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


