पुणे,१ जुलै 2025 : टीआयई पुणे ने या वर्षाच्या सुरूवातीला 13 व्या आवृत्तीमध्ये 35 उच्च-कार्यक्षम स्टार्टअप्ससाठी यशस्वीरित्या नर्चर ॲक्सिलरेटर उपक्रम पूर्ण केल्यानंतर 14 व्या आवृत्तीसाठी अर्ज सुरू करण्याची घोषणा केली आहे. टीआयई ही स्टार्टअप्स साठी समर्पित ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे.
नुकतेच पार पडलेल्या नर्चर 13 ॲक्सिलरेटर उपक्रमाच्या समारोप समारंभात पुणे,मुंबई,औरंगाबाद,हुबळी,हैदराबाद,दिल्ली आणि बंगळुरू येथील विविध स्टार्टअप्सचा समावेश होता.
यामध्ये हेल्थटेक, फिनटेक,ॲग्रीटेक, क्लीनटेक, क्लायमेटटेक, एआय, रोबोटिक्स, विविध उद्योगांमध्ये वर्कफ्लो ऑटोमेशनसाठी सास सोल्युशन्स, ई-कॉमर्स आणि वित्तीय व्यवस्थापन (फिन-ऑप्स) तसेच अन्न आणि रसायन उत्पादन क्षेत्रातील होते. या विविधतेतून भारतातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये नर्चर प्रोग्रॅमची नाविन्यपूर्ण योगदान स्पष्टपणे दिसून येते.
प्रारंभापासूनच, टीआयई पुणे नर्चर अॅक्सेलरेटर हा संस्थापक-केंद्रित दृष्टिकोन असलेला एक अत्यंत प्रभावशाली कार्यक्रम ठरला आहे. अनुभवी उद्योजकांकडून मिळणारे मार्गदर्शन, सखोल बिझनेस अॅनालिसिस आणि वैयक्तिक सल्ला ही याची वैशिष्ट्ये आहेत.
आता आपल्या 14 व्या आवृत्तीत हा उपक्रम सातत्याने आपला स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठीचे अर्ज अधिकृतपणे खुले असून नवीन कार्यक्रम सप्टेंबर 2025 च्या अखेरीस सुरू होईल. आगामी आवृत्ती संस्थापक-केंद्रित मार्गदर्शन, स्केलेबल बिझनेस मॉडेल्स, गुंतवणूकदारांची तयारी आणि शाश्वत नवोपक्रमावर सशक्त भर असलेल्या नवीन युगातील क्षेत्रांवर टीआयई पुणे लक्ष केंद्रित करणार आहे.
“नर्चर प्रोग्रॅमची खरी ताकद म्हणजे आमचे मार्गदर्शक. ते फक्त व्यवसाय यशासाठी नव्हे, तर संस्थापकांची मानसिक स्थैर्य, समंजस विचारशक्ती आणि स्पष्ट दृष्टिकोनाने उद्योजकीय प्रवास पार करण्याची तयारी घडवतात,” असे स्मिता येडेकर, अध्यक्षा – नर्चर १३ व १४, टीआयई पुणे यांनी सांगितले.
टीआयई पुणेच्या जागतिक नेटवर्क आणि खोलवर रूजलेल्या मार्गदर्शन प्रणालीच्या (मेंटॉरशिप इकोसिस्टम) च्या पाठिंब्याने आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवू इच्छिणाऱ्या स्टार्टअप संस्थापकांना 14 व्या उपक्रमासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
अर्ज करण्यासाठी किंवा अधिक जाणून घेण्यासाठी,भेट द्या. www.tiep
une.org
—


