Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedशॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे 2,500 कोटी रु. च्या आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय डीआरएचपी सादर

शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे 2,500 कोटी रु. च्या आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय डीआरएचपी सादर

भारतातील आघाडीची लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार कंपनी शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे गोपनीय ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (Confidential DRHP) सादर केला आहे.

 

 

 

स्रोतांच्या माहितीनुसार, आयपीओचे एकूण मूल्य 2,000 रु. – 2,500 कोटी रु. च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. यामध्ये फ्रेश इश्यू आणि विद्यमान भागधारकांकडून ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. कंपनीचे मूल्य सुमारे 8,500 कोटी रु. इतके असण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या शेवटच्या निधी उभारणीमध्ये कंपनीने सुमारे 6,000 कोटी रु. च्या अंदाजे मूल्यांकनावर प्रायमरी आणि सेकंडरी भांडवल उभारले होते.

 

 

 

स्रोतांच्या मते, फ्रेश इश्यूतून मिळणारी रक्कम कंपनीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी, वाढीला चालना देण्यासाठी आणि नेटवर्क व्यवसायामध्ये पुढील गुंतवणूक करण्यासाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे.

 

 

 

ई-कॉमर्स विभाग हा कंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून सुमारे 75% व्यवसाय याच विभागातून येतो. उर्वरित उत्पन्न क्विक कॉमर्स आणि हायपरलोकल डिलिव्हरीमधून येते.

 

 

 

शॅडोफॅक्सला फ्लिपकार्ट, TPG, एट रोड्स व्हेंचर्स, मिराई अ‍ॅसेट व्हेंचर्स आणि नोकिया ग्रोथ फंड्स यांसारख्या आघाडीच्या गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे.

 

 

 

शॅडोफॅक्स भारतातील ई-कॉमर्स एक्सप्रेस पार्सल आणि मूल्यवर्धित सेवांसाठी आघाडीची लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार कंपनी आहे. शॅडोफॅक्सने 2,200 हून अधिक शहरांमध्ये आणि 14,300 पेक्षा अधिक पिन कोड्समध्ये विस्तारलेल्या मजबूत वितरण नेटवर्कसह लॉजिस्टिक्स उद्योगामध्ये आपली बाजारपेठेतील आघाडीची भूमिका प्रस्थापित केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments