गजा अल्टरनेटिव्ह असेट मॅनेजमेंट लिमिटेड, ही गजा कॅपिटल या ब्रँडअंतर्गत कार्यरत कंपनी आहे. कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) नियामकांकडे गोपनीय ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केले आहे.
ही कंपनी 2004 मध्ये स्थापन झाली असून, शिक्षण, ग्राहक आणि वित्तीय सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना ग्रोथ कॅपिटल पुरविते.
जानेवारी 2025 मध्ये कंपनीने प्रायव्हेट लिमिटेडमधून पब्लिक लिमिटेडमध्ये रूपांतर करून आपले नाव बदलून गजा अल्टरनेटिव्ह असेट मॅनेजमेंट लिमिटेड असे ठेवले.
कंपनीने चालू महिन्याच्या सुरुवातीस प्री-आयपीओ फंड-रेझिंग फेरीत ₹125 कोटी उभारले असून, त्यावेळी कंपनीचे मूल्यांकन ₹1,625 कोटी इतके होते.
नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर फंड मॅनेजर्सना नवीन फंड्स सुरू करण्यासाठी भांडवल म्हणून, तसेच भारतात आणि परदेशात वितरण क्षमता वाढविण्यासाठी केला जाणार असल्याचे समजते. या निधीचा वापर नव्या फंड व्यवस्थापन धोरणांमध्ये विस्तार करण्यासाठीही केला जाईल. हा आयपीओ कंपनीला शेअर बाजारात लिस्टिंगचे फायदे मिळवून देईल आणि ब्रँडची ओळख अधिक दृढ करण्यास मदत करेल.
गजा कॅपिटल ही भारतातील आघाडीची प्रायव्हेट इक्विटी (PE) / पर्यायी मालमत्ता व्यवस्थापन कंपनींपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्यातील नेतृत्व तयार करणाऱ्या महत्वाकांक्षी उद्योजकांना ग्रोथ कॅपिटल पुरविण्यावर लक्ष केंद्रित करते. 2004 मध्ये स्थापन झालेली गजा कॅपिटल ही भारतातील पहिली संस्था-आधारित आणि स्वतंत्र प्रायव्हेट इक्विटी फर्म म्हणून ओळखली जाते, जिला कामगिरी व मूल्यनिर्मितीचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. गजा कॅपिटल उदयोन्मुख भारतीय कंपन्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत आघाडीच्या संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचा भागीदार म्हणून मान्यता प्राप्त आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाचे नेतृत्व श्री. यू. के. सिन्हा (नॉन-एग्झिक्युटिव्ह चेअरमन) करतात. संचालक मंडळातील नॉन-एग्झिक्युटिव्ह सदस्यांमध्ये श्री. शैलेश हरिभक्ती, श्री. पृथ्वी हल्दिया, श्री. मनीष सभरवाल, श्री. अरिंदम भट्टाचार्य आणि श्रीमती शीतल मेहरा यांचा समावेश आहे. एग्झिक्युटिव्ह संचालकांमध्ये संस्थापक गोपाल जैन, रणजीत शहा आणि इम्रान जाफर यांचा समावेश आहे. गजा कॅपिटलच्या निवडक गुंतवणुकीमध्ये टीमलीज, लाइटहाउस लर्निंग, आरबीएल बँक, जॉन डिस्टिलरीज, एक्सप्रेसबीज, ईआय, लीडस्क्वार्ड आणि सिगन्झी यांचा समावेश आहे.


