पुणे, दि. 3 जुलै २०२५ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) आणि झेक रिपब्लिकमधील आर्चिप विद्यापीठात नुकताच एक सांमजस्य करार झाला. त्यानुसार झेक रिपब्लिकमधील ‘नागरी नियोजन आणि रचना’ या विषयावर तिथे नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये बीएनसीएतील तीन प्राध्यापक तसेच पदवीपूर्व वर्गांमधील 33 विद्यार्थिनी सहभागी झाले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून हा सामंजस्य करार संपन्न झाला. डॉ.कश्यप म्हणाले की, या करारानुसार दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील जॉईंट स्टूडिओ आणि संयुक्त संशोधनासाठी प्रत्यत्न करण्यात आले. तसेच दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांचेही आदान-प्रदान करण्यात आले. झेक रिपब्लिकच्या भेटीत बीएनसीएतील या प्रकल्पाच्या प्रमूख डॉ. श्रुती जोशी, तसेच प्रा. सुरभी गडकरी आणि प्रा. पूजा घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आर्चिप विद्यापीठातील वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) महाविद्यालयातील चार प्राध्यापक आणि पदव्युत्तर वर्षाच्या 12 विद्यार्थिनी सहभागी झाले.
यासंबंधी अधिक माहिती सांगताना डॉ. श्रुती जोशी म्हणाल्या की, कार्यशाळेतून झेक रिपब्लिकमधील प्राग शहरातील उपनगर वेलेस्तावीन येथील मेट्रो स्टेशन परिसराचा अभ्यास करण्यात आला. तिथे जास्तीत जास्त नागरिकांना आकर्षित करणे , तसेच तेथील मेट्रो स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेवर नवीन सुविधा, भूशास्त्ररचनेचा (लॅण्डस्केप) वापर करून ती जागा नवीन पिढीला आकर्षित करणे आणि तिचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर यासंबंधीचा प्रस्ताव बीएनसीएच्या विद्यार्थिनींकडून देण्यात आला. यासाठी आम्ही व आमच्या विद्यार्थिनींनी चर्चा करून तेथील निवासी भाग, अन्य इमारती आणि त्यामधील मोकळी जागा यांचा समन्वय साधताना त्यामध्ये नागरी भूशास्त्ररचनेचा दृष्टिकोन अंगीकारला.
डॉ. जोशी पुढे म्हणाल्या की, मुख्य म्हणजे वेलेस्ताविन मेट्रो स्टेशन परिसरातील विरळ मानवी वस्ती, आणि तेथील जागा आणि सुविधांच्या जास्तीत जास्त वापरासाठी अधिक लोकांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे होते. यासाठी वास्तूरचनाशास्त्रातील विविध तत्त्वांचा आवलंब करून नवीन रचनात्मक उपाय सुचवला व तसा आराखडाही तयार करून दिला. त्यासाठी त्या संपूर्ण स्थानिक भागाचे रचनात्मक नियोजनही करण्यात आले.
त्या पुढे म्हणाल्या की, तेथील विविध नागरी नियोजनाच्या समस्यांवरील विषयांवर व्यवहार्य मार्ग वास्तूरचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुचवण्यासाठीच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याची सुरुवात चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात झाली. तेव्हा झेक रिपब्लिकमधील आर्चिप विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी पुण्यात बीएनसीएमध्ये आले होते. त्यावेळीही याच विषयावर पहिली कार्य शाळा आयोजित करण्यात आ
ली होती.


