पुणे : लायन्स क्लबचे रविंद्र गोलर यांची जिल्हा एलसीआयएफ (लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन) समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गोलर यांच्याकडे याआधी कॅबिनेट सेक्रेटरी पदाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांकडून त्यांना विशेष पदकाने गौरवण्यात देखील आले आहे. प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी २०२५ -२६ या वर्षासाठी रविंद्र गोलर यांची जिल्हा एलसीआयएफ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
रविंद्र गोलर म्हणाले, लायन्स क्लब ही संस्था पुण्यात गरजूंचे आरोग्य, शिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी कार्यरत असते. या उपक्रमांसाठी आवश्यक असलेला निधी उभारणे हे जिल्हा एलसीआयएफ समन्वयकचे महत्त्वाचे काम आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.


