पुणे, ९ जुलै २०२५: पुणे स्थित गोल्डलिफ एंन्टरटेन्मेंटच्या वतीने दुसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धेचे १३ जुलै २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानावर या ठिकाणी होणार आहे. ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा यांनी प्रायोजित केले असून स्पर्धेला बेलवलकर ग्रुपचा पाठिंबा लाभल्यास असून आणि सस्टेनेबिलिटी पार्टनर इको फॅक्टरी फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.
ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्व अय्यर म्हणाले की, ‘ पहिल्या आवृत्तीला पुणेकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारची इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यात प्लॅस्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे.’
तसेच, विशेष म्हणजे या वर्षी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन या स्पर्धेत यंदाच्या वर्षी प्रथमच पावाथॉन या तीन किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत स्पर्धकांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसोबत सहभागी होता येणार आहे. या विशेष शर्यतीमुळे जीवनशैलीमध्ये आरोग्यपूर्ण आणि आरोग्य प्राणी चपळ अशा एका विशेष शैलीचे भर पडणार असून आपल्या प्राण्या प्राण्यांबरोबर त्यांना निकटचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे पुण्यातील निसर्ग सौंदर्याचा आणि पावसाळ्यातील हवामानाचा आपल्या लाडक्या सोबत याबरोबर आनंद घेता येणार आहे, असेही अय्यर म्हणाले.
‘निसर्गाच्या सान्निध्यात धावणे आणि त्याच्या जतनासाठी हातभार लावणे हा वेगळा अनुभव या मॅरेथॉनमधून मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून शाश्वततेला चालना देण्यासाठी आणि एका चांगल्या कारणासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी तसेच समाजाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे बेलवलकर ग्रुपचे संचालक समीर बेलवलकर यांनी सांगितले.
‘ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्व सांगणारा संदेश समाजापर्यंत पोहोचला जाणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सामुदायिक सहभागाने अधिकाधिक झाडे लावण्यास मदत होईल,’ असे दि इको फॅक्टरी फाऊंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी सांगितले.
हेमंत काब्रा यावेळी म्हणाले की, पुण्याचे वैशिष्ट्य असलेल्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनला पाठिंबा देताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत असून त्यासाठी या शर्यतीच्या मार्गावर पर्यावरण पूरक अशा ई-बाईकची मदत देताना आम्हाला आनंद होत आहे. शर्यतीच्या मार्गावरील स्पर्धकांना सर्व प्रकारचे सहाय्य देणे आणि समन्वय साधने यासाठी या ई बाईकची खूपच मदत होणार आहे.
प्रत्येक धावपटूला एक रोपटे आणि सीड बॉल दिले जाणार आहे. स्पर्धकांना दिले जाणारे टी शर्ट हे पुनर्निवनीकरण केलेल्या पीईडी बाटल्यांपासून बनवले गेले आहेत. शर्यतीच्या मार्गावर पुनर्वापर केलेले पाणी उपलब्ध केले जाईल. शर्यती दरम्यान स्पर्धकांबरोबर असलेले पायलट देखिल बिगॉसच्या ईव्ही बाईक्स वापरणार आहेत. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येकास ज्यूटची बॅग, पदक, नाश्ता, मार्ग सहाय्यक, गिफ्ट व्हाऊचर आणि एक ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरु
यातील २१ कि.मी. अंतराची अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरु होऊन तळजाई डोंगर, पद्मावती पार्किंग, ट्रेझर पार्क मार्गे अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज चौक मार्गे सदू शिंदे क्रिकेट मैदानावर संपेल. १० कि.मी. अंतराची शर्यत दोन टप्प्यात आणि ५ कि.मी. शर्यत एका टप्प्यात धावेल.
मुख्य २१ कि.मी. पुरुष आणि महिला गटातील विजेत्याला करंडक आणि रोख ११ हजार रुपये, तर उपविजेत्याला करंडक आणि रोख ७ हजार रुपये, १० कि. मी. शर्यत जिंकणाऱ्याला करंडक आणि ८ हजार रुपये, तर उपिवजेत्याला करंडक आणि रोख ५ हजार रुपये, ५ कि.मी. शर्यत जिंकणाऱ्यास करंडक आणि रोख ६ हजार रुपये, उपविजेत्याला करंडक आणि रोख ३ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनसाठी नावनोंदणी करण्यासाठी https://www.townscript.com/e/green-pune-monsoon-marathon-2-130113 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक चौकशीसाठी आयोजकांशी भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल) सिद्ध शिरोळे 7387091004 यांच्या
शी संपर्क साधावा.


