Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedबायोमेडिकल इनोव्हेशन हबच्या विस्तारासाठी आयआयटी बॉम्बे आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनची भागीदारी ·...

बायोमेडिकल इनोव्हेशन हबच्या विस्तारासाठी आयआयटी बॉम्बे आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनची भागीदारी · या भागीदारीमुळे आयआयटी बॉम्बे येथील बायोमेडिकल सेंटरची क्षमता वाढेल. · सेंटरच्या विस्तारासाठी ₹ 70 कोटी देण्याचे आयसीआयसीआय फाऊंडेशनचे आश्वासन

मुंबई : देशातील प्रमुख तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी संस्थेतील बायोमेडिकल इनोव्हेशन हबचा विस्तार करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई आणि आयसीआयसीआय बँकेची सीएसआर शाखा आयसीआयसीआय फाऊंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ (आयसीआयसीआय फाऊंडेशन) यांनी भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, आयआयटी मुंबई येथील बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरमध्ये (बीईटीआयसी) अतिरिक्त मजले उभारण्यासाठी आणि येथे अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी ₹70 कोटी देण्याचे आश्वासन आयसीआयसीआय फाऊंडेशनने दिले आहे.

 

 

 

आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय दत्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

 

 

 

या नव्याने विस्तारल्या जाणाऱ्या भागाला ‘आयआयटी-आयसीआयसीआय बेटिक हब’ असे नाव देण्यात आले असून यामुळे आयआयटी बॉम्बेच्या बायोमेडिकल अभियांत्रिकीच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल. या विस्तारामुळे त्यांना पाच पट जास्त जागा मिळणार असून यामुळे केंद्राची एकूण जागा 19,700 चौरस फूट एवढी होईल. तसेच यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आणि निदान प्रक्रिया विकसित करण्यासाठी संशोधक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि उद्योगातील प्रमुखांमध्ये सहकार्य वाढीस लागेल. उत्पादन विकास, वैद्यकीय दृष्ट्या आणि त्या दर्जाचे उत्पादन, सुरक्षा चाचणी, तपासणी तसेच पॅकेजिंगसाठी ते अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. नव्याने विस्तारित झालेल्या या परिसंस्थेमुळे मेड-टेक स्टार्टअप्स आणि कंपन्यांना पाठबळ मिळेल, आरोग्यसेवा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमात व्यावसायिकांना प्रशिक्षण मिळेल आणि उच्च-मूल्याच्या नोकऱ्या निर्माण करेल, ज्याचा लाखो रुग्णांना फायदा होईल.

 

 

 

या सहकार्याबद्दल आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे म्हणाले, “उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य वास्तविक जगावर कसा परिणाम करू शकते, तसेच नवनवीन उपक्रम राबवते याचे ही भागीदारी हे उत्तम उदाहरण आहे. आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या भक्कम पाठबळाच्या आधारे आयआयटी बॉम्बे बायोमेडिकल संशोधन आणि तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणण्यास सज्ज आहे. भारतीय आरोग्यसेवेतील प्रमुख अडचणी दूर करून सर्वांच्या आवाक्यातील आणि स्केलेबल असे घरगुती उपाय विकसित करण्यावर आमचा भर असेल.”

 

 

 

या भागीदारीबद्दल आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कुमार सिन्हा म्हणाले, “आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सीएसआर उपक्रमांमध्ये आरोग्यसेवेला नेहमीच प्राधान्य असते. भारतातील आरोग्यसेवेसमोरील आव्हाने – एखाद्याच आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ, प्रचंड ग्रामीण लोकसंख्या आणि उपाय आवाक्यात नसणे अशा अनेक अडचणींमुळे बायोमेडिकलमध्ये स्वदेशी उपक्रम विकसित करणे ही काळाची गरज आहे. जे गरजांनुसार तयार केले जातात. स्वदेशी प्रगतीमुळे केवळ आयातीवरील अवलंबित्व कमी होणार नाही तर किफायतशीर, अत्याधुनिक वैद्यकीय उपायांना चालना मिळेल जे आरोग्यसेवा व्यावसायिकांना सक्षम बनवू शकतील आणि त्याचा देशभरातील लाखो लोकांना फायदा होईल. आयसीआयसीआय फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्यातील सहकार्याचे हेच उद्दिष्ट आहे. रुग्णांना परवडणारे आरोग्यसेवा उपाय उपलब्ध करून देऊन स्वदेशी वैद्यकीय नवोपक्रमांना ‘आयआयटीबी-आयसीआयसीआय बेटिक हब’ चालना देईल. आरोग्यसेवा परिसंस्थेत अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आयआयटी बॉम्बेसोबतच्या सहयोगामुळे आम्ही आनंदी आहोत.”

 

 

 

आयसीआयसीआय फाउंडेशनने आतापर्यंत आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या विविध उपक्रमांद्वारे देशभरातील 550 रुग्णालयांमध्ये 25 लाखांहून अधिक लोकांवर उपचारांची सोय करत त्यांच्या आयुष्यावर एक सकारात्मक परिणाम केला आहे. आजाराचे लवकरात लवकर निदान करून त्यावर तात्काळ उपायांना सुरुवात करण्यासाठी आरोग्यव्यवस्थेला सक्षम करणे याचाही यात समावेश होतो. कर्करोग, हृदयरोग, डोळे, एखादा मानसिक धक्का तसेच आपत्कालीन परिस्थिती याचा यात समावेश होतो.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments