नवी दिल्ली, १० जुलै २०२५ – भारतातील आघाडीच्या स्वायत्त शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, १२ जुलै २०२५ रोजी (शनिवार) नवी दिल्लीत अन्कुर वारीकू (उद्योजक, लेखक, वक्ते आणि करिअर मार्गदर्शक) यांच्या प्रमुख उपस्थितीत करिअर ग्रोथ सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात करिअर समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, विविध नोकरदार, पदवीधर, प्रारंभिक आणि मध्यम स्तरावरील करियर प्रोफेशनल, माजी विद्यार्थी, कॉर्पोरेट प्रोफेशनल, कॉर्पोरेट एचआर, जे आपले करियर बदलू इच्छितात किंवा करियर मध्ये पुढे जाऊ इच्छितात यांच्या करीता विशेष करिअर ग्रोथ सेमिनार घेण्यात येणार आहे. हा सेमिनार सर्वांसाठी विनामूल्य घेतला जाणार आहे.
दिनांक: शनिवार, १२ जुलै २०२५, वेळ: सायंकाळी ४:३० ते ९:०० वाजता, द ललित, नवी दिल्ली – बराखंबा अव्हेन्यू, कनॉट प्लेस, नवी दिल्ली – 110001 येथे मोफत (पण नोंदणी आवश्यक- नोंदणीसाठी लिंक: https://admissions.scdl.net/scdladmission/?utm_source=press) प्रवेश असणार आहे.
या सेमिनारमध्ये अन्कुर वारीकू हे थीम: (“वेंचरिन्ग इन टू द रिअल वल्ड – Venturing into the real World”) सध्याच्या गतिमान युगात यशस्वी करिअर घडवण्यासाठी काय गरजेचं आहे, सतत बदलणाऱ्या परिस्थितीत स्वतःला अपडेट कसे ठेवावे आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन करतील. करिअर समुपदेशन, एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स, डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास, एससीडीएल बद्दल सादरीकरण, पुरस्कार वितरण समारंभ, या विषयावर कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
संध्याकाळी ५:०० – ६:००: अन्कुर वारीकू यांचे करिअर सेमिनार – “वेंचरिन्ग इन टू द रिअल वल्ड”
संध्याकाळी ५:०० – ६:४५: एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स (फक्त निमंत्रितांसाठी)
संध्याकाळी ७:१५ – ८:१५: डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास
संध्याकाळी ८:१५ – ८:४५: एससीडीएलची माहितीपट आणि सादरीकरण
संध्याकाळी ८:४५ – ९:००: पुरस्कार वितरण समारंभ
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) हे यंदा आपले २५वे स्थापना वर्ष – रौप्य महोत्सव साजरे करत आहे. भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त शिक्षण संस्था म्हणून, एससीडीएलने आजवर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे आणि सध्या ८०,००० हून अधिक सक्रिय विद्यार्थी संपूर्ण देशभरातून शिक्षण घेत आहेत. एससीडीएल हे पदवीधर आणि कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी विशेषतः डिझाइन केलेले विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी दूरस्थ शिक्षण शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. २००१ मध्ये स्थापित, एससीडीएल हे भारत आणि परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लवचिक, उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी आहे. पुण्याच्या मध्यभागी स्थित, एससीडीएल अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कुशल आणि समर्पित प्राध्यापक आणि प्रगत डिजिटल शिक्षण उपलब्ध आहे. विविध क्षेत्रांमध्ये उद्योग-संबंधित पदव्युत्तर पदविका कार्यक्रम देण्याकरिता एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमांव्यतिरिक्त, एससीडीएल विशेष कॉर्पोरेट कार्यक्रम ऑफर करण्यासाठी आघाडीच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग देखील करते, याचा एक भाग म्हणून हे सेमिनार घेण्यात आले.
या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून, एससीडीएल देशभरात करिअर ग्रोथ सेमिनार्सची मालिका आयोजित करत आहे. हा सेमिनार त्याच मालिकेतील एक भाग असून, देशातील तरुण विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी एक मौल्यवान आणि विनामूल्य शिकण्याची संधी निर्माण करत आहे. हा कार्यक्रम मोफत आहे पण नोंदणी आवश्यक आहे, त्या करिता https://admissions.scdl.net/scdladmission/?utm_source=press या लिंक वर नाव नोंदवा.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एससीडीएल केवळ शैक्षणिकच नव्हे तर करिअर व वैयक्तिक विकासाच्या संधी निर्माण करत आहे. अन्कुर वारीकू यांच्यासोबतचा हा प्रेरणादायी सेमिनार विशेषतः विद्यार्थ्यांपासून ते कामकाजात असलेल्या व्यावसायिकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.


