ऐन्थम बायोसायन्सेस लिमिटेडच्या (“कंपनी”) प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येकी इक्विटी शेअरसाठी 540 रु. ते 570 रु. असा किंमतपट्टा निश्चित
· प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – शुक्रवार, 11 जुलै 2025
· बोली/ऑफर खुली होण्याचा दिनांक – सोमवार, 14 जुलै 2025 आणि बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक – बुधवार, 16 जुलै 2025
· बोली किमान 26 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 26 च्या पटीत लावता येईल
· रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दिनांक 8 जुलै 2025 (“RHP”) लिंक: https://www.jmfl.com/Common/getFile/5085
राष्ट्रीय, 9 जुलै 2025: ऐन्थम बायोसायन्सेस लिमिटेड (“कंपनी”) सोमवार, 14 जुलै 2025 रोजी प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) सुरू करणार आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक बोली/ऑफर खुली होण्याच्या एक कामकाज दिवस आधी असून शुक्रवार, 11 जुलै 2025 आहे. बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक बुधवार, 16 जुलै 2025 आहे.
ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर साठी 540 रु. ते 570 रु. असा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 26 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 26 च्या पटीत लावता येईल.
या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मध्ये विक्री समभागधारकांकडून 33,950 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्ससाठीच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. त्यामध्ये गणेश संबशिवम यांच्याकडून 3,500 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स , के. रविंद्र चंद्रप्पा यांच्याकडून 3,500 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स, विरिडिटी टोन LLP कडून 13,250 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पोर्ट्समाउथ टेक्नॉलॉजीज LLC, मलय जे. बरुआ, रुपेश एन. किणेकर आणि सतीश शर्मा यांच्याकडून प्रत्येकी 3,200 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रकाश कारियबेट्टन यांच्याकडून 800 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि के. रामकृष्णन यांच्याकडून 100 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी (“Employee Reservation Portion”) 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे 82.50 दशलक्ष रु. पर्यंतचे आरक्षण समाविष्ट आहे. या रक्कमेपैकी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला भाग वगळून उर्वरित ऑफरला “नेट ऑफर” म्हणले जात आहे. पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरक्षित भागासाठी बोली लावताना प्रत्येकी इक्विटी शेअरवर 50 रु. ची सवलत (“Employee Discount”) दिली जाणार आहे.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “Stock Exchanges”) या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध होण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी जेएम फायनान्शियल लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अॅण्ड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.


