आयनॉक्स क्लीन एनर्जीने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे 6,000 कोटी रु. पेक्षा अधिक रक्कम उभारण्याच्या उद्देशाने सेबीकडे आपला डीआरएचपी गोपनीयतेने दाखल केला आहे अशी माहिती या घडामोडींशी परिचित उद्योगातील सूत्रांनी दिली.
सुमारे 10 टक्क्यांहून अधिक इक्विटी डायल्यूशन प्रस्तावित असलेल्या या आयपीओ द्वारे कंपनी सुमारे 50,000 कोटी रु. चे बाजार भांडवलीकरण (Market Capitalisation) साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने शुक्रवारी एका सार्वजनिक घोषणेत कंपनीने “प्रस्तावित आयपीओ संदर्भात सेबी व स्टॉक एक्स्चेंजेसकडे प्री-फाईल्ड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे,” असे सांगितले.
उद्योगातील सूत्रांनी सांगितले की पब्लिक ऑफर मधला मोठा भाग फ्रेश इश्यूचा (Fresh Issue) असून त्यातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग सौरऊर्जा व स्वतंत्र वीज उत्पादक कंपन्यांच्या (Independent Power Producers – IPPs) नव्या सुविधांची उभारणी करण्यासाठी केला जाणार आहे.
आयनॉक्स क्लीन एनर्जी ही कंपनी आपल्या उपकंपन्या आयनॉक्स निओ एनर्जीज आणि आयनॉक्स सोलर मार्फत अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित व चालविणे तसेच सौर सेल्स व मॉड्यूल्सचे उत्पादन करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे.
सध्या, आयनॉक्स क्लीन एनर्जीकडे एकूण 157 MW कार्यरत क्षमता आहे. त्यामध्ये 107 MW पवन ऊर्जा आणि 50 MW सौरऊर्जा समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, 400 MW क्षमतेचे प्रकल्प बांधणीच्या टप्प्यात असून त्यात 350 MW हायब्रीड आणि 50 MW सौर प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीकडे 2.2 GW पेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पांचे नियोजन प्रगत अवस्थेत असल्याचे CareEdgeच्या जून 2025 च्या अहवालात नमूद केले आहे.
प्रस्तावित आयपीओ साठी बुक रनिंग लीड मॅनेजर्समध्ये जेएम फायनान्शियल, मोतीलाल ओसवाल, नुवामा, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज यांचा समावेश आहे.


