Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedलॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडकडून जैव-रसायन रि-एजंटटसाठी पेटंट दाखल

लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडकडून जैव-रसायन रि-एजंटटसाठी पेटंट दाखल

लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजने जागतिक दर्जाची पेटंट उत्पादने विकसित करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) संस्थांशी तांत्रिक करार केला

९९.७ टक्के अचूकता, उच्च पातळीची संवेदनशीलता आणि २४ महिन्यांच्या शेल्फ-लाइफचै वैशिष्ट्य
३०० हून अधिक विक्रेते असलेल्या संपूर्ण भारतातील वितरण जाळ्याचा लाभ उपकारक
सार्क, आफ्रिकी आणि पूर्व युरोपीय देशांमध्ये निर्यातीची योजना

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जागतिक आरोग्य सेवा विभाग लॉर्ड्समेडने ट्रायग्लिसराइड्स, युरिक अॅसिड, अल्कलाइन फॉस्फेटस, बिलीरुबिन, कॅल्शियम (आर्सेनाझो III), क्रिएटिनिन, ग्लुकोज, सीरम ग्लुटामिक ऑक्सॅलोअॅसिटिक ट्रान्समिनेज (एसजीओटी)/ अॅस्पारेट अमिनोट्रान्सफेरास, सीरम ग्लुमॅटिक पायरूव्हिक ट्रान्समिनाज (एसजीपीटी), अलानाइन अमिनोट्रान्सफेरास (एएलटी) आणि टोटल प्रोटिन यासाठी १० जागतिक दर्जाचे रि-एजंट आणि निदान चाचणी संच (डायग्नोस्टिक टेस्टिंग किट्स) प्रस्तुत केले आहेत. हे रि-एजंट ९९.७ टक्के अचूकता, संवेदनशीलतेची सर्वोच्च पातळी, २४ महिन्यांचे शेल्फ-लाइफ, अद्वितीय पॅकेजिंग आणि स्पर्धात्मक किंमत अशा वैशिष्ट्यांसह प्रस्तुत झाले आहेत. गंभीर आजारांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यंत्रणा मजबूत करणाऱ्या या साधनांसाठी कंपनीने भारताचे पेटंट दाखल केले आहे.

लॉर्ड्समेड या रि-एजंट आणि निदान चाचणी संचांची निर्मिती महाराष्ट्रातील तिच्या उत्पादन केंद्रात करेल आणि ती पॅथॉलॉजिकल लॅब, हॉस्पिटल्स आणि संशोधन संस्थांना त्यांच्या ३०० हून अधिक विक्रेते असलेल्या संपूर्ण भारतातील वितरण जाळ्याद्वारे उपलब्ध केले जाईल. लॉर्ड्समेड स्वतःच्या पॅथॉलॉजिकल लॅबच्या साखळीमध्ये देखील हे संच वापरेल. प्रमुख जागतिक बाजारपेठेत रि-एजंट निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे. आगामी दोन वर्षांत या संचाचा पुरवठा संपूर्ण भारतामध्ये आणि सार्क, आफ्रिकी आणि पूर्व युरोपातील देशांमध्ये करण्याचे लॉर्ड्समेडचे उद्दिष्ट आहे.

या प्रस्तुतीवर भाष्य करताना, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, सच्चिदानंद उपाध्याय म्हणाले, “भारतात परवडणाऱ्या आणि दर्जेदार रि-एजंट आणि निदान चाचणी संचाची मागणी जुनाट आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रसारामुळे, निदान हस्तक्षेपाचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे फायदे याबद्दल वाढती जागरूकता यामुळे सातत्याने वाढत आहे. अतुलनीय अचूकता, संवेदनशीलता आणि दीर्घ शेल्फ लाइफ असलेले आमचे रि-एजंट किंवा टेस्टिंग संच गंभीर आजारांसाठी प्रतिबंधात्मक निदान हस्तक्षेप रूपरेषेला पुन्हा परिभाषित करतील. भारतीय पेटंटला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याने, जागतिक बाजारपेठेत सहज स्वीकारार्हता मिळावी यासाठी आम्ही आमच्या संचांसाठी भारतीय पेटंट दाखल केले आहे. आमची मजबूत उत्पादन क्षमता आणि देशांतर्गत आणि जागतिक वितरण जाळे यासह, आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये दर्जेदार निदान संचांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत.”

लॉर्ड्समेडची उत्पादन सुविधा वसई येथे आहे आणि कंपनी सध्या अनुक्रमे लखनऊ, उत्तर प्रदेश आणि सिल्वासा, दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात दुसरी आणि तिसरी उत्पादन सुविधा स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता मानकांच्या बाबतीत या सुविधा आशियामध्ये नवीन मानदंड स्थापित करण्यासाठी सज्ज होत आहेत.

लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजने जागतिक दर्जाची पेटंट उत्पादने विकसित करण्यासाठी आयआयटी मुंबई, भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) आणि इतर प्रमुख संस्थांशी तांत्रिक करार केला आहे आणि या भागीदाऱ्यांमुळे निदान उद्योगाचा चेहरामोहरा बदलला जाईल. लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज सिकलसेल, तोंडाचा कर्करोग आणि क्षयरोग यांसारख्या गंभीर आजारांसाठी सर्वोच्च अचूकतेसह परवडणारे नॉन-इन्व्हेसिव्ह निदान संच विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे.

लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजबद्दल:

वर्ष १९९८ मध्ये स्थापित, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने (लॉर्ड्स) कागदापासून ते एलईडी ते नवीकरणीय ऊर्जेपर्यंत प्रभावी वाढ साधली आहे आणि वैद्यकीय निदान उद्योगात समूहाची भव्यतम प्रगती सुरू आहे. लॉर्ड्स आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन, जीनोम चाचणी, व्हिटॅमिन उद्योग आणि आरोग्यसेवा यांमध्ये ठसा उमटवला आहे. विविधीकरणाद्वारे वाढ या प्रवाहाचा हा समूह जनक बनला आहे आणि लॉर्ड्सच्या यशाचा हाच आधारस्तंभ आहे.

वेबसाइट – https://lordsmark.com/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments