Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedफर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी सीडबॉल मेकिंग कार्यशाळेत मग्न*"

फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी सीडबॉल मेकिंग कार्यशाळेत मग्न*”

 

बुधवार,दिनांक १६ जुलै रोजी, फर्ग्युसन महाविद्यालयातील पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने “*सीडबॉल मेकिंग कार्यशाळा*” नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कडुनिंब,फणस, जांभूळ,चिंच, आंबा, लिची, तुळशी, शिकेकाई, रिठा, अशा विविध प्रजातीच्या बियांचे संकलन करून या कार्यशाळेत सक्रीय सहभाग घेतला. साधारणतः सदरील कार्यशाळेत 200 पेक्षा अधिक सीडबॉल विद्यार्थ्यांनी तयार केले. तसेच तयार केलेल्या सीडबॉलचे बिजारोपण विद्यार्थी फर्ग्युसन टेकडीवर करणार आहेत. या कार्यशाळेप्रसंगी उपप्राचार्य, डॉ. डी डी कुंभार यांनी ’पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण’ याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. रुपाली गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली होती, सदरील कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी रुपाली सांगळे, डॉ. परमेश्वर जाधव, मनीषा काळे, सीमा पाटील,रुपाली ब्रह्मे, आदेश देशपांडे, विवेक भगत , जागृती महाजनी, तारीनी जोशी, कल्पना जोशी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments