पुणे,13 फेब्रुवारी 2023 : गेल्या वर्षी मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर श्रीला चॅटर्जी यांच्या तर्फे पुण्यात बॅरोमार्केट पॉप अप चे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कला,हस्तकला,सजावट,अपॅरल अशा अनेक गोष्टी प्रदर्शित केल्या जातील. भेट देणार्यांना अद्वितीय खरेदी अनुभव देणार्या बॅरोमार्केटचे आयोजन 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम येथे करण्यात आले आहे.यासाठी प्रवेश सर्वांना खुला व मोफत आहे.बॅरोमार्केट पॉप अप हे सर्जनशीलता व संस्कृती साजरे करत स्थानिक प्रतिभेला पाठिंबा देत कुशल कारागिरीचा अनुभव देईल.
पुण्यामध्ये बॅरोमार्केट पॉप अप चे आयोजन
RELATED ARTICLES


