ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि आरोग्य वर्ल्ड यांच्यासह भागिदारीमध्ये ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्स पुरस्कारांचे आयोजन. या प्रतिष्ठित कार्यक्रमात वर्कप्लेस वेलनेसशी संबंधित नव्या मापदंडाविषयी संवाद साधला जाणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे आरोग्य व स्वास्थ्यावर कायमस्वरूपी लक्ष केंद्रित करणाऱ्या भारत आणि जगभरातील आघाडीच्या कंपन्यांचा सन्मान करणार.
ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्सचे आयोजन २० आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी
मुंबई, १८ जुलै २०२५ – गोदरेज इंडस्ट्रीज समूहाने ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस (GCHW) आणि आरोग्य वर्ल्ड यांच्या भागिदारी केली असून त्याअंतर्गत गोदरेज वन, मुंबई येथे ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात भारत व जगभरातील आरोग्य क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा केली जाणार आहे.
ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस समिट अँड अवॉर्ड्सचे २० आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतात पहिल्यांदाच आयोजन केले जात असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय लीडर्स, आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ, औद्योगिक संघटना, पॉलिसीमेकर्स व कंपन्या एकत्र येऊन कर्मचाऱ्यांचे आरोग्य व स्वास्थ्यासाठी अत्याधुनिक धोरणांविषयी चर्चा करणार आहेत. ही कॉन्फरन्स ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि आरोग्य वर्ल्ड या भारतात वर्कप्लेस हेल्थ क्षेत्रातील आघाडीच्या, नॉन- प्रॉफिट कंपनीसह भागिदारीमध्ये आयोजित केली जाणार आहे. भारतात यापूर्वी झालेल्या आरोग्य वर्ल्ड समिट्सने दिलेल्या शिकवणीच्या पायावर ही कॉन्फरन्स आधारित आहे. कामाचे भविष्य, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वर्कप्लेसमधील समावेश आणि ईएसजी (एन्व्हॉरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स) उद्दिष्टांची आरोग्यसेवा पद्धतींशी सुसंगती इत्यादी विषयांचा त्यात समावेश असेल. यावर्षीच्या समिटने वर्कप्लेस वेलनेस क्षेत्रात नवे जागतिक मापदंड प्रस्थापित केले आहेत. या समिटमध्ये कर्मचाऱ्यांचे आरोग्य व स्वास्थ्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या भारतातील आघाडीच्या कंपन्या पुढे आणल्या जातील तसेच २०२५ मधील जगातील सर्वात निरोगी वर्कप्लेसेसची माहिती दिली जाईल.
नॉन- कम्युनिकेबल डिसीजेसना (एनसीडी) प्रतिबंध, मानसिक आरोग्यासाठी पाठिंबा, स्वास्थ्याचा कंपनीच्या धोरणांमध्ये समावेश अशा विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या समिटमध्ये जगभरातील आरोग्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण आव्हाने व संधी तसेच भारतीय परिस्थितीची वैशिष्ट्ये यांवर चर्चा केली जाईल. या कॉन्फरन्समध्ये पुराव्यासह कॉर्पोरेट वेलनेस उपक्रम आणि आरोग्य वर्ल्डच्या मायथाली न्युट्रिशन प्रोग्रॅम, लाइफस्टाल कोच ट्रेनिंग प्रोग्रॅम, टोबॅको- फ्री वर्कप्लेस धोरणांसह इतर सर्वोत्तम पद्धतींचा समावेश केला जाणार आहे.
या समिटचे आयोजन करण्याच्या संधीविषयी गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप हेड कॉर्पोरेट सर्व्हिस, अजय भट्ट म्हणाले, ‘गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये आम्ही कायमच पारंपरिक पद्धतींपलीकडे जात आरोग्य व स्वास्थ्याला चालना देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सची गरज असल्याचा प्रसार केला आहे. ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि आरोग्य वर्ल्ड यांच्याशी केलेली भागिदारी हेल्दी वर्कप्लेसवर भर देण्याच्या आमच्या संस्कृतीशी सुसंगत आहे. आम्ही कॉर्पोरेट इंडियाला प्रगतीशील धोरणांचा अवलंब करण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य जपण्यासाठी आणि आजच्या वेगाने बदलत असलेल्या वर्कप्लेसेसवरील त्यांच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रेरणा देत आहोत.’
ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेसचे मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स डिरेक्टर बॅरी क्रिस्प म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांचे स्वास्थ जपण्याची सुरुवात करण्यासाठी आजची वेळ योग्य आहे. मुंबईत आमच्या १३ व्या ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस अवॉर्ड्स अँड समिटचे आरोग्यवर्ल्ड व गोदरेज इंडस्ट्रीसह आयोजन करणं ही आरोग्याविषयी जागरूक संस्कृतीला चालना देत संबंधित जागतिक पद्धती शेयर करण्याची जबरदस्त संधी आहे. ‘गुड हेल्थ इज गुड बिझनेस’ या तत्वावर आमचा विश्वास आहे आणि या समिटमध्ये वर्कप्लेस वेलबिइंगला सर्व क्षेत्रे आणि प्रदेशांत प्राधान्य मिळवून देण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी सुसंगत कार्य केले जाणार आहे.’
आरोग्य वर्ल्डच्या चीफ ऑफ प्रोग्रॅम्स श्रीमती स्रबानी बॅनर्जी म्हणाल्या, ‘कर्मचाऱ्यांच्या समग्र स्वास्थ्याशी बांधिलकी जपत आरोग्य वर्ल्डमध्ये आम्ही इतर कंपन्यांना आरोग्याची संस्कृती रूजवण्यासाठी मदत करतो. डेटाच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रमुख व्यावसायिक धोरणात समावेश करण्यासाठी आणि पर्यायाने सामाजिकदृष्ट्या जास्त जबाबदार पद्धती कंपन्यांच्या धोरणात समाविष्ट होण्यासाठी सहकार्य केले जाते. ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप यांच्यासह भागिदारी करून हा संवाद जागतिक पातळीवर नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
या भागिदारींमुळे सर्वोत्तम पद्धती शेयर करण्यासाठी, नवे ट्रेंड्स समजून घेण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आरोग्य धोरणे व पद्धतींवर आधारित अर्थपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळेल.


