पुणे :- सौम्य ते तीव्र पोटदुखी, विशेषतः जेवणानंतर, बहुतेकदा ॲसिडिटी किंवा अपचन म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ते पित्ताशयाच्या खड्यांचे लक्षण असू शकते. ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्ये पित्ताशयाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने, गुंतागुंत टाळण्यासाठी तज्ञांकडून वेळीच उपचारांचा सल्ला दिला जातो.
पित्ताशयातील खडे हे घन कण आहेत जे पित्ताशयामध्ये तयार होतात, यकृताच्या खाली स्थित एक लहान अवयव. ते आकार आणि संख्येने भिन्न असू शकतात आणि या खड्यांमुळे वेदना किंवा संसर्ग होईपर्यंत बरेच लोक याबाबत अनभिज्ञ असतात. सामान्य लक्षणांमध्ये उजव्या बाजूस ओटीपोटाच्या वर तीव्र वेदना, मळमळ, उलट्या, पोट फुगणे किंवा चरबीयुक्त अन्नाच्या सेवनानंतर अस्वस्थता यांचा समावेश आहे.
*अपोलो स्पेक्ट्रा पुणे येथील जनरल सर्जन डॉ. नितीन पोटे सांगतात की,* ४० ते ५० वयोगटातील प्रौढांमध्ये पित्ताशयाच्या खड्यांची समस्या उद्भवते. चरबीयुक्त आहार, लठ्ठपणा, जलद वजन कमी होणे आणि बैठी जीवनशैली ही यामागची कारणे असू शकतात. महिला आणि ४० वर्षांवरील व्यक्तींना पित्ताशयाचा त्रास होण्याची शक्यता असते. ही लक्षणे गॅस किंवा ॲसिडिटीच्या लक्षणांसारखी असल्याने बऱ्याचदा गोंधळून टाकतात व त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अल्ट्रासाऊंडद्वारे वेळीच निदान केल्याने पित्ताशयाचे संक्रमण, जळजळ आणि पित्त नलिकेतील अडथळे देखील टाळता येतात. रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मिनीमली इन्व्हेसिव्ह लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करुन पित्ताशय काढून टाकण्यात येते. ही प्रक्रिया जलद बरे होण्यास, जखम कमी करण्यास आणि रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यास मदत करतो.
*डॉ. पोटे पुढे सांगतात की,* पित्ताशयाचे खडे टाळण्यासाठी, चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळत संतुलित आहाराचे सेवन करावे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली बाळगा, जेवण टाळणे किंवा जलद वजन कमी करणे टाळा आणि जर तुम्हाला पचनक्रियेत त्रास होत असेल तर नियमित तपासणी
करा.


