Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedL&T फायनान्स लिमिटेड (LTF) ने 30 जून 2025 रोजी समाप्त झालेल्या...

L&T फायनान्स लिमिटेड (LTF) ने 30 जून 2025 रोजी समाप्त झालेल्या पहिल्या तिमाहीत (Q1FY26) 701 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा (PAT) नोंदवला. तिमाही-दर-तिमाही (QoQ) हा नफा 10% नी तर वार्षिक-दर-वार्षिक (YoY) 2% नी वृद्धींगत झाला आहे. तसेच, कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक एकत्रित व्यवसाय ₹1,02,314 कोटी एवढा नोंदवला आहे. यामध्ये ₹99,816 कोटींच्या रिटेल व्यवसायाचा समावेश आहे. यात वार्षिक-दर-वार्षिक अनुक्रमे 15% आणि 18% नी वृद्धी नोंदवण्यात आली आहे.

30 जून 2025 रोजी समाप्त झालेल्या पहिल्या तिमाहीत, रिटेल वितरण ₹17,522 कोटींवर पोहोचले. हे वार्षिक आकडेवारीच्या तुलनेत 18% नी जास्त आहे.

 

30 जून 2025 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, अक्वायर्ड गोल्ड लोन पोर्टफोलिओचे यशस्वी एकत्रीकरण करण्यात आले. तसेच एसएमई फायनान्समध्ये ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ सुरू करण्यात आला.

 

 

एल अँड टी फायनान्स लिमिटेड (LTF) ही भारतातील एक अग्रेसर नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. 30 जून 2025 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ₹701 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (PAT) नोंदवला आहे. ही आकडेवारी मागील तिमाहीच्या तुलनेत 10% आणि मागील वर्षाच्या तुलनेत 2% नी वाढली आहे. या तिमाहीत, LTF कंपनीने ₹1,02,314 कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा नफा वार्षिक 15% नी अधिक आहे. याच कालावधीतच रिटेल व्यवसायाची आकडेवारी ₹99,816 कोटींवर पोहोचली आहे. जी वार्षिक 18% नी जास्त आहे. 30 जून 2025 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने ₹17,522 कोटींचे तिमाही रिटेल वितरण नोंदवले आहे, जे वार्षिक 18% नी अधिक आहे. या तिमाहीत रिटेल व्यवसाय 98% एवढा नोंदवला गेला, जो ‘लक्ष्य 2026’ च्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे.

 

आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी (S&P Global Ratings आणि Fitch Ratings) द्वारे LTF ला पहिल्यांदाच इन्व्हेस्टमेंट ग्रेड क्रेडिट रेटिंग देण्यात आले आहे. S&P Global Ratings ने LTF ला “BBB-” दीर्घकालीन आणि “A-3” शॉर्ट टर्म इश्युअर क्रेडिट रेटिंग दिले आहे. दीर्घकालीन रेटिंगसाठीचा आऊटलुक सकारात्मक आहे. फिच रेटिंग्जने LTF ला “BBB-” च्या स्थिर आऊटलुकसह दीर्घकालीन विदेशी आणि स्थानिक चलन इश्युअर डिफॉल्ट रेटिंग्स (IDR) दिले आहे. हे लाँग टर्म रेटिंग इन्व्हेस्टमेंट ग्रेडचे असून ते भारताच्या सॉवरेन क्रेडिट रेटिंगच्या बरोबरीचे आहे. यामुळे कंपनीला जागतिक भांडवल बाजारात प्रवेश करता येईल आणि त्यांच्या विश्वासार्ह फ्रांचायजीत अधिक विविधता आणता येईल, तसेच गुंतवणूकदारांची संख्या वाढवता येईल.

 

LTF द्वारे इन-हाऊस विकसित केलेले स्वत:च्या मालकीचे क्रेडिट अंडररायटिंग इंजिन ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ एसएमई फायनान्ससाठी सुरू करण्यात आले आहे. त्याची अद्ययावत आवृत्ती टू-व्हीलर फायनान्समध्ये लागू करण्यात आली आहे.

 

कंपनीचे ग्राहक-केंद्रित ‘PLANET’ ॲप जे ग्राहकांसाठी एक शक्तिशाली डिजिटल चॅनेल म्हणून उदयास आले आहे. हे ॲप 1.86 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. ज्यात ग्रामीण भागातील 16.7 लाखांपेक्षा जास्त डाउनलोड्सचा समावेश आहे. आजपर्यंत या चॅनेलने ₹4,800 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. तर सुमारे 7.85 कोटी विनंत्यांना प्रतिसाद दिला आहे. आणि ₹15,500 कोटींहून अधिक कर्ज वितरित केले आहे. कंपनीने एक सुधारित ग्राहक-केंद्रित वेबसाइट आणि पुढील पिढीचे ‘PLANET 3.0’ देखील लॉन्च केले आहे.

 

 

सदर आर्थिक निकालांवर टिप्पणी करताना, LTF एमडी आणि सीईओ श्री. सुदीप्ता रॉय म्हणाले, “या आव्हानात्मक तिमाहीतही, आमच्या कंपनीने परिणामांवर लक्ष केंद्रित केले आणि बाजारातील अडथळे हाताळण्याची आमची क्षमता दर्शवून दिली. तंत्रज्ञान आणि मजबूत क्रेडिट गार्डरेल्सच्या आधारावर योग्य ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेमुळे हे काम करणे शक्य झाले. त्याचबरोबर आम्ही सर्व व्यवसायांमध्ये वसुलीच्या कार्यक्षमतेवर विशेष लक्ष ठेवले आहे. भविष्यात शाश्वत आणि अंदाजे वाढीसाठी पाया तयार करत, मजबूत मालमत्ता गुणवत्तेवर बारीक लक्ष ठेवून, जोखमीनुसार समायोजित केलेल्या व्यवसाय वाढीवर आमचा भर कायम असेल.”

 

“या तिमाहीत, आम्ही आजपर्यंतचा सर्वाधिक ₹1 लाख कोटींपेक्षा अधिकचा एकत्रित व्यवसाय यशस्वी केला आहे. आमच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे कर्ज यासारखे सुरक्षित आणि अधिक उत्पन्न देणारे उत्पादन समाविष्ट केले. आमच्या कंपनीला S&P Global Ratings द्वारे ‘BBB-/Positive’ आणि फिच रेटिंग्ज द्वारे ‘BBB-/Stable’ असे पहिले इन्व्हेस्टमेंट ग्रेड क्रेडिट रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग जागतिक भांडवल बाजारातून निधी मिळवून आमच्या लायबलिटी फ्रांचायझीमध्ये आणखी विविधता आणण्यासाठी आधार म्हणून काम करेल. आमचे AI-आधारित पुढील पिढीचे डिजिटल क्रेडिट इंजिन, ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ आमच्या दुचाकी वित्तव्यवसायात लवकरच चांगले परिणाम देऊ लागले आहे. आणि या तिमाहीत ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ फार्म व्यवसायात वाढवण्यात आले आणि SME वित्तव्यवसायात सुरू करण्यात आले. आम्ही आमच्या जोखीम आणि क्रेडिट फ्रेमवर्कला सतत मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जे भविष्यात आम्हाला चांगले यश देईल.”

 

 

प्रमुख वैशिष्ट्ये:

 

मजबूत रिटेल फ्रँचायझी:

कंपनीची सूक्ष्म आणि अखिल भारतीय रिटेल फ्रँचायझी तिच्या मजबूत वितरण क्षमतेमुळे अग्रेसर आहे. यामध्ये सुमारे 2,089 ग्रामीण मीटिंग सेंटर्स/शाखा आणि शहरी केंद्रांमधील 407 शाखांमधून जवळपास 2 लाख गावांमध्ये भौगोलिक उपस्थितीचा समावेश आहे. दशकभरात तयार केलेल्या 13,000 हून अधिक डिस्ट्रीब्युशन पॉइंट्समुळे ही एवढी विस्तृत भौगोलिक उपस्थितीला साध्य करण्यात आली आहे.

कंपनी आपल्या 2.6 कोटींहून अधिक ग्राहकांच्या डेटाबेसचा उपयोग विश्वसनीय क्रॉस-सेल आणि अप-सेल फ्रँचायझी चालवण्यासाठी करते. ज्यामुळे याचा Q1FY26 मध्ये कंपनीच्या पुनर्वितरण मूल्यामध्ये 35% आणि संख्येत 49% वाटा आहे.

 

 

वैविध्यपूर्ण रिटेल फ्रँचायझीची निर्मिती:

 

ग्रामीण व्यवसाय वित्त:

Q1FY26 मध्ये वितरण ₹5,618 कोटी (मागील वर्षी ₹5,773 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 3% नी घट.

व्यवसाय आकार ₹26,616 कोटी (मागील वर्षी ₹25,887 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 3% नी वाढ.

 

शेतकरी वित्त :

Q1FY26 मध्ये वितरण ₹2,200 कोटी (मागील वर्षी ₹1,903 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 16% नी वाढ.

व्यवसाय आकार ₹15,756 कोटी (मागील वर्षी ₹14,204 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 11% नी वाढ.

 

दुचाकी वित्त :

Q1FY26 मध्ये वितरण ₹2,128 कोटी (मागील वर्षी ₹2,621 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 19% नी घट.

व्यवसाय आकार ₹12,331 कोटी (मागील वर्षी ₹12,025 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 3% नी वाढ.

 

वैयक्तिक कर्ज :

Q1FY26 मध्ये वितरण ₹1,942 कोटी (मागील वर्षी ₹1,178 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 65% नी वाढ.

व्यवसाय आकार ₹9,383 कोटी (मागील वर्षी ₹6,667 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 41% नी वाढ.

 

गृहकर्ज आणि मालमत्तांवरील कर्ज:

Q1FY26 मध्ये वितरण ₹2,780 कोटी (मागील वर्षी ₹2,245 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 24% नी वाढ.

व्यवसाय आकार ₹26,464 कोटी (मागील वर्षी ₹19,961 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 33% नी वाढ.

 

एसएमई फायनान्स:

Q1FY26 मध्ये वितरण ₹1,273 कोटी (मागील वर्षी ₹978 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 30% नी वाढ.

व्यवसाय आकार ₹6,964 कोटी (मागील वर्षी ₹4,471 कोटींच्या तुलनेत), वार्षिक 56% नी वाढ.

या तिमाहीत, LTF ने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहला घेऊन ‘आपके बिझनेस का गेम चेंजर’ या टॅगलाइनसह बिझनेस लोन कँपेन सुरू केले. जलद आणि कार्यक्षम निधीसाठी डिजिटल अर्ज प्रक्रियेद्वारे व्यवसाय कर्ज कसे दिले जाते, तसेच ते वेळेवर भांडवल पुरवण्यासाठी त्वरित वितरण करते आणि लवचिक कॅश फ्लो व्यवस्थापनासाठी ॲप-आधारित पैसे काढण्याची सुविधा देते, हे या कँपेनमध्ये विशेषत्वा

ने दाखवण्यात आले.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments