मुंबई, 21 जुलै 2025: भारतातील आघाडीच्या स्टॉकब्रोकर्सपैकी एक एचडीएफसी सिक्युरिटीजने आज एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) वर त्यांची नाविन्यपूर्ण मार्जिन ट्रेडिंग सुविधा (MTF) सुरू करण्याची घोषणा केली. ETF व्यवहारांसाठी मार्जिन फंडिंगची सुविधा उपलब्ध करून ETF गुंतवणुकीचे सार्वत्रिकीकरण साधत ही नवीन योजना व्यवहारातील ग्राहकांची लवचिकता वाढवण्याच्या तसेच भांडवली कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे.
नवीन MTF सुविधेअंतर्गत, ग्राहकांना स्पर्धात्मक दराने दररोज व्याज दरावर फंडिंग मिळू शकते, ज्यामुळे ETFs वर मार्जिन ट्रेडिंग अधिक सुलभ आणि किंमतीच्या दृष्टीने फायदेशीर होते. ही सेवा ग्राहकांना त्यांच्या गुंतवलेल्या रकमेच्या 4 पट पर्यंत परतावा मिळवून देतेमु. त्यामुळे ETF ट्रेडिंगसाठी अधिक लाभ आणि तरलता मिळते. यात प्रमुख निर्देशांक, क्षेत्रीय, थीम आधारित, निश्चित उत्पन्न, कमोडिटीज आणि आंतरराष्ट्रीय निर्देशांक यांचा समावेश असून हे दोन्ही InvestRight आणि HDFC SKY प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
सध्या, InvestRight आणि HDFC SKY वर 74 विशिष्ट ETFs मार्जिन ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. ETF मार्जिन ट्रेडिंगसाठी किमान अपफ्रंट मार्जिन आवश्यकता 25% आहे, जी योजनेनुसार 40% पर्यंत जाऊ शकते.
ग्राहकांना InvestRight आणि HDFC SKY या दोन्ही अॅप्लिकेशनमध्ये एक समर्पित विभाग उपलब्ध असेल. तिथे ते सर्व MTF संबंधित व्यवहार एका स्क्रीनवर सहजपणे ट्रॅक करू शकतात. हा एकात्मिक प्लॅटफॉर्म पारदर्शकता आणि ट्रॅकिंगची सोय पुरवतो, गुंतवणूकदारांना त्यांच्या मार्जिन ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीजवर रिअल-टाईम माहिती मिळवून देतो. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना त्यांच्या मार्जिन पोझिशन्स कधीही डिलिव्हरीमध्ये रूपांतरित करण्याची लवचिकता मिळते. त्यायोगे त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक नियंत्रण मिळते.
या सादरीकरणाबाबत मत व्यक्त करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धीरज रेली म्हणाले, “ETFs वर आमची नवीन MTF सेवा आमच्या ग्राहकांना गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यासाठी आणि अधिक भांडवली कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आली आहे. सरळ स्वरूप, कमी खर्च व समजण्याची सोपी रचना यामुळे ETFs भारतात लोकप्रिय ठरत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये विविधीकरण दिल्यामुळे गुंतवणूकदार भारताच्या विकास प्रवासात सक्रियपणे सहभागी होऊ शकतात. त्यामुळे, ETFs हे देशातील विकसित होत असलेल्या गुंतवणूक क्षेत्राचे महत्त्वपूर्ण घटक बनले आहेत. त्यांच्या परवडणाऱ्या किंमती आणि विविधीकरणाच्या वैशिष्ट्यांमुळे ते बाजाराच्या गरजांशी सुसंगत ठरतात आणि भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये एक आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून उभे राहतात.”
“ETF बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2024 अखेर ETF ची एकूण व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता AUM सुमारे 8 लाख कोटी रु. होती. मार्च 2024 मधील 6.95 लाख कोटी रु. पासून ही वाढ झाली आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या एकूण AUM शी तुलना करता ETFs चे प्रमाण सुमारे 12-13% असून यावरून या ॲसेट क्लासकडे सातत्याने वाढती मागणी दिसून येत आहे.”
“तथापि, मार्जिन ट्रेडिंग सुविधा (MTF) ही काही जोखमी घेऊन येते हे ओळखणे महत्त्वाचे आहे. लीवरेज वापरल्यामुळे तोट्याचाही परिणाम वाढू शकतो आणि व्यवहार करणाऱ्यांना लिक्विडेशनचा धोका टाळण्यासाठी योग्य मार्जिन पातळी राखावी लागते. त्यामुळे लीवरेज ETF ट्रेडिंग करताना सुज्ञ जोखीम व्यवस्थापन आणि काळजी घेणे आवश्यक आहे. आमचे ETF वरील संशोधन गुंतवणूकदारांना योग्य थीम किंवा सेक्टर निवडण्यात मार्गदर्शन करते,” असे श्री. रेली यांनी पुढे सांगितले.
एचडीएफसी सिक्युरिटीज सातत्यपूर्ण नाविन्यता आणि आपल्या गुंतवणूक सेवांची श्रेणी सतत विस्तारून, गुंतवणूकदारांना अधिक सोयीस्कर व आत्मविश्वासाने आर्थिक उद्दिष्टे गाठण्यास मदत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर कायम आहे.
“सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.” “MTF ही SEBI परिपत्रक CIR/MRD/DP/54/2017 दिनांक 13 जून 2017 च्या तरतुदींनुसार लागू आहे.” “ETFs ही एक्स्चेंजने मान्यता दिलेले उत्पादने नाहीत आणि यांच्याशी संबंधित कोणत्याही तक्रारी एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवर हाताळल्या जाणार नाहीत.”


