सोनी लिव्हवरील सिरीज ‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’मध्ये कायदेशीर शोडाऊनचे मनोरंजन घेण्यास सज्ज राहा. या सिरीजमध्ये जेनिफर विंगेटने अत्यंत मोहक अनुष्का रायसिंघानीची भूमिका साकारली आहे. वकिल असलेली अनुष्का तिच्या चतुर कायदेशीर विचारसरणीसह, तसेच तिच्या आकर्षक पेहरावासह सर्वांचे लक्ष वेधून घेते. जेनिफरने साकारलेली भूमिका अनुष्का स्मार्ट, स्पष्ट मताची आणि नैतिकदृष्ट्या उच्च व्यावसायिक आहे. तिच्या पेहरावामधून तिचे व्यक्तिमत्त्व दिसून येते.
जेनिफरचा आकर्षक पेहराव कोर्टातील ड्रामामध्ये ग्लॅमरस ट्विस्टची भर करतो. शोच्या या पैलूबाबत सांगताना जेनिफपर विंगेट म्हणाली, ”अनुष्का रायसिंघानी लक्षवधेक व्यक्तिमत्त्व असून तिला कायदेशीर बाबींची जाण आहे, तिची स्टाइल आकर्षक व प्रभावी आहे. ती मनापासून काम करणारी वकील आहे, जे कायद्याच्या क्षेत्रात क्वचितच पाहायला मिळते. अनुष्काला वरचढ ठरवणारी बाब म्हणजे तिच्या मोहकतेसह व्यावसायिक क्षमतेशी जुळून जाण्याची तिची क्षमता, जी तिच्या वॉर्डरोब निवडींमधून दिसून येते. कोर्टामध्ये प्रभुत्व राखायचे असो किंवा दैनंदिन जीवनात आत्मविश्वास व्यक्त करायचा असो अनुष्काच्या पेहरावामधून तिची क्षमता व व्यक्तिमत्त्व दिसून येते. आकर्षक ड्रेसिंगच्या माध्यमातून ती फॅशन स्टेटमेंट व्यक्त करण्यासह तिच्या कौशल्यांना देखील सादर करते. आकर्षक बनवलेले सूट्स व फॉर्मल सेटिंग्जसाठी लक्षवेधक ज्वेलरी ते खास प्रसंगांसाठी आकर्षक ड्रेसेसपर्यंत प्रत्येक आऊटफिटमधून तिचे व्यक्तिमत्त्व दिसून येते. अनुष्काला तिच्या क्षमता व कमकुवत बाबींबाबत माहित आहे, जे तिचे व्यक्तिमत्त्व आणि स्टाइलमध्ये सुरेखपणे सामावलेले आहेत.”
‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’ लक्षवेधक कोर्टरूम ड्रामा सादर करेल. या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार जसे करण वाही, रीम समीर शेख आणि संजय नाथ यांच्यासह जेनिफर विंगेट प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज या तीन व्यावसायिकांच्या जीवनाला सादर करण्यासह नैतिक पेचप्रसंगांची गुंतागुंत आणि सोप्या मार्गापेक्षा योग्य मार्ग निवडण्याच्या आव्हानाला दाखवते.
पहा ‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’ १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते बुधवार रात्री ८ वाजता फक्त सोनी लिव्हवर


