• आंतरराष्ट्रीय चवींचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय खवय्यांसाठी कूल रॅंच आणि जलापेनो साल्सा हे जागतिक ख्यातीचे फ्लेवर्स बाजारात
• भारताच्या नाचो विभागात डोरिटोजचे स्थान आणखी मजबूत
• हे नवीन फ्लेवर्स आता आधुनिक व्यापार, ई-वाणिज्य आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर २० रूपये आणि ५० रूपये किमतीत उपलब्ध
नवी दिल्ली, २५ जुलै २०२५: पेप्सिकोचा आगळावेगळा नाचो चिप ब्रँड डोरिटोस® भारतात त्याचे दोन सर्वात आयकॉनिक जागतिक प्रकार – कूल रॅंच आणि जलापेनो साल्सा मेक्सिकाना – घेऊन येत आहे. त्यामुळे देशातील साहसी स्नॅकिंगची वाढती आवड पूर्ण केली जाईल. नाचो चीज, मसाला मेहेम आणि स्वीट चिली सारख्या लोकप्रिय स्थानिक चवींच्या यशावर आधारित आलेले हे उत्पादन भारतातील ब्रँडसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतीय ग्राहक जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय चवींचा शोध घेत असताना ही नवीन उत्पादने डोरिटोस® च्या पोर्टफोलिओचा धोरणात्मक विस्तार करतात. कूल रॅंचमध्ये एक क्रीमी, हर्बी टँग आहे, तर जलापेनो साल्सा मेक्सिकानामध्ये मिरचीचा उत्तम स्वाद आहे – ही दोन्ही उत्पादने भारतीय चवींनुसार जुळवण्यात आली आहेत. या चवी चाहत्यांना माहीत आहेत आणि आवडतात आणि सिग्नेचर डोरिटोस क्रंचशी तडजोड करत नाहीत.
नाट्यमयता वाढवण्यासाठी डोरिटोजने® विविध डिजिटल जाहिरातींची एक मालिका सुरू केली आहे. प्रत्येक जाहिरातीत चिप बनवण्याच्या प्रक्रियेची एक धमाल, सिनेमॅटिक गोष्ट सांगितली आहे. त्यात सोनेरी मक्यापासून ते फ्लेवरने परिपूर्ण परफेक्शनपर्यंत प्रत्येक गोष्ट आहे. मग एक भुकेला चाहता सेटवर धावत येतो, पॅक चलतो आणि पळून जातो. धमाल व्हिज्युअल्स आणि डोरिटोज क्रंचनी परिपूर्ण या फिल्म्स एकच संदेश देतातः हे जागतिक फ्लेवर्स तुम्ही चुकवू शकणार नाही इतके चविष्ट आहेत.
या अनावरणाबाबत बोलताना पेप्सिको इंडियाच्या डोरिटोस कॅटेगरी प्रमुख आस्था भसीन म्हणाल्या,“भारताच्या स्नॅकिंगच्या सवयी वेगाने विकसित होत आहेत. ग्राहक अशा चवी शोधतात ज्या साहसी पण परिचित आहेत – आणि हे त्यांच्या वाढत्या जागतिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. आजचे ग्राहक अशा धाडसी चवींच्या अनुभवांकडे आकर्षित होतात ज्या त्यांना त्यांच्या आवडीच्या आंतरराष्ट्रीय चवींशी जोडतात. पण तरीही स्थानिक पसंतींशी जुळतात. डोरिटोसच्या सर्वात प्रसिद्ध जागतिक प्रोफाइलपैकी दोन – कूल रॅंच आणि जलापेनो साल्सा मेक्सिकाना यांच्यासह आम्ही भारतात प्रतिष्ठित, जागतिक स्तरावर आवडीचे फ्लेवर्स आणून या वाढत्या गरजा पूर्ण करत आहोत. हे अनावरण केवळ पोर्टफोलिओ विस्तार नाही; तर ते दररोजच्या स्नॅकिंगला विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर भर देते. नाचो चिप सेगमेंटमध्ये जगातील नंबर वन* असलेले डोरिटोस® धाडसी चवी आणि मजबूत जागतिक ओळखीसह श्रेणी पुन्हा परिभाषित करत असून वाढत्या भारतीय चवीशी सांगड घालणारी विशिष्ट, चविष्ट उत्पादने आणत आहे.”
नवीन कूल रँच आणि जलापेनो साल्सा मेक्सिकाना फ्लेवर्स आता प्रमुख महानगरांमधील निवडक आधुनिक व्यापार केंद्रे, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि क्विक कॉमर्स चॅनेलमध्ये उपलब्ध आहेत. २० रुपये आणि ५० रुपये किंमतीचे हे धाडसी नवीन प्रीमियम फ्लेवर्स भारतातील स्नॅकिंग क्षेत्रात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. त्यासोबत डिजिटल जाहिराती आता इंस्टाग्रामवर लाइव्ह आहेत. त्या या जागतिक लाडक्या उत्पादनांचा उत्सव साजरा करणाऱ्या मजेदार, दृश्यात्मक ट्विस्टसह ही उत्पादने भारतात आल्याचे घोषित करत आहेत.
* युरोमॉनिटर इंटरनॅशनल लिमिटेड; स्नॅक्स; टॉर्टिला चिपच्या व्याख्येनुसार नाचो चिप, रिटेल व्हॅल्यू आरएसपीच्या दृष्टीने, सर्व रिटेल चॅनेल, मागील वर्षाची माहिती


