नवी दिल्ली, भारत- जुलै १५, २०२५ – सीगेट टेक्नोलॉजी होल्डिंग्ज पीएलसी या मास कपॅसिटी डेटा स्टोरेजमधील जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने आज ३० टीबी एक्सोस एम आणि आयर्नवुल्फ प्रो हार्ड ड्राइव्ह्ज जागतिक मार्गाने उपलब्ध झाल्याची घोषणा केली. सीगेटच्या मोझॅक थ्री प्लस प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आलेल्या आणि हीट-असिस्टेड मॅग्नेटिक रेकॉर्डिंग (एचएएमआर) तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या या ड्राइव्ह्जचे इंजिनीअरिंग, एआय उपयोजनामुळे वाढत असलेल्या विस्तारणाजोग्या व उच्च कामगिरी करणाऱ्या स्टोरेजच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. पारंपरिक उद्योग संरचना विकासाला एआयचे उपयोजन पूरक ठरत आहे. आता १० लाखांहून अधिक मोझेक हार्ड ड्राइव्ह्ज उपलब्ध झाल्यामुळे सीगेटने अनेक महत्त्वाचे टप्पे सर केले आहेत- कंपनीच्या ‘ब्रेकथ्रू’ समजल्या जाणाऱ्या स्टोरेज तंत्रज्ञानातील बळ आणि प्रगल्भता यामुळे अधोरेखित झाली आहे.
“आज जगातील एकूण डेटापैकी सुमारे ९० टक्के केवळ १० देशांमध्ये साठवला जातो. मात्र, डेटाच्या वजनामुळे नेटवर्क्स अगदी कडेपर्यंत खेचली जाण्याचे प्रमाण वाढले आहे, कारण सुमारे १५० देशांनी डेटा स्वायत्ततेसाठी नियम केले आहेत आणि एआय वर्कलोड्स सातत्याने विस्तारत आहेत. ऑन-प्रिम (कंपन्यांच्या आवारातील डेटा सेंटर्स), खासगी आणि स्वायत्त डेटा सेंटर्स त्यांनी स्वत: विकसित केलेल्या डेटाचे मूल्य खुले करण्यासाठी एआयचाच लाभ घेत आहेत,” असे सीगेटच्या एज स्टोरेज अँड सर्व्हिसेस विभागाच्या एसव्हीपी मेलीसा बॅण्डा म्हणाल्या. “आमच्या ३० टीबी ड्राइव्ह्ज या जलद गतीने वाढणाऱ्या प्रवाहांना सहाय्य करण्याच्या तसेच एआय वर्ललोड्सना ताकद देणाऱ्या क्षमता, कार्यक्षमता व स्थितीस्थापकत्व प्राप्त करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आल्या आहेत.”
उद्योगक्षेत्रातील प्रमुख कंपन्या मुलभूत डेटा व्यवस्थापन व पायाभूत सुविधांमधील स्थित्यंतरांच्या मुद्दयावर एकत्र येत आहेत:
“हायपरस्केलर्स (मोठ्या प्रमाणात क्लाउड सेवा पुरवणाऱ्या कंपन्या) आणि उद्योगांची डेटा सेंटर्स एआय पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी होणाऱ्या जोरदार स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आहेत. याची परिणती म्हणून कामगिरीवर आधारित हार्डवेअरमधील कॅपेक्स खर्चात वेगाने वाढ होत आहे,” असे आयडीसीमधील हार्ड डिस्क ड्राइव्ह अँड स्टोरेज टेक्नोलॉजीज विभागाचे संशोधन संचालक एड बर्न्स म्हणाले. “कमी प्रलंबित कामगिरी सहसा न दाखवणाऱ्या सर्वोच्च क्षमतेच्या एचडीडी हे एआय विकास प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण धोरणात्मक बलस्थान आहे, आज बाजारपेठेत उपलब्ध असलेली तसेच भविष्यातील सर्वोच्च दर्जाची एआय प्रारूपे तयार करण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक पायाभूत डेटाच्या मोठ्या क्षमतेच्या साठवणीची गरज त्या पूर्ण करत आहेत. डेटा सेंटर्सची घनता सुधारण्यासाठी, ऊर्जा वापर कमी करण्यासाठी तसेच फूटेजच्या गरजा पूर्ण करतानाच स्टोरेजद्वारे धोरणात्मक आवश्यकतांची पूर्तता सातत्याने होत राहील याची खात्री करण्यासाठी उद्योगांमधील ग्राहक उपायांच्या शोधात असतात. सीगेटचे नवीन ३० टीबी एक्सॉस उत्पादन म्हणजे बाजारात आज उपलब्ध असलेली सर्वोच्च घनतेची हार्ड ड्राइव्ह आहे. मोठ्या क्षमतेच्या स्टोरेजमध्ये सुयोग्य कामगिरी आणि खर्चाचा समतोल यांच्या शोधात असलेल्या हायपरस्केल आणि उद्योगांमधील डेटा सेंटर्सचे ग्राहकांना सीगेटच्या एचएमआर उत्पादन आराखड्याचा लाभ मिळेल. ही कंपनी येत्या वर्षभरात एचडीडींसाठी हवाई घनतावाढीला वेग देण्यास सज्ज आहे.”
● ऑन-प्रिम एआय बाजारपेठ येत्या तीन वर्षांत ९० टक्के सीएजीआरवर वाढ साध्य करून ४२ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणार असा अंदाज एपीईने व्यक्त केला आहे.
● एनव्हीआयडीआयएने एआय फॅक्टरींचे वर्णन ‘मोठ्या प्रमाणावर बुद्धिमत्ता निर्माण करणारी नव्या स्वरूपातील डेटा सेंटर्स’ असे केले आहे. डेटाचे रूपांतर संपूर्ण एआय जीवनचक्रामध्ये तत्काळ (रिअल-टाइम) मिळणाऱ्या माहितीमध्ये करण्यासाठी ही डेटा सेंटर्स अत्यावश्यक आहेत.
एआय व्यवसाय धोरणाचे केंद्र झालेले असताना स्टोरेजचे आधुनिकीकरण हे ऐच्छिक राहिलेले नाही- ते पायाभूत झाले आहे.
३० टीबी हायपरस्केल-ग्रेड एक्झॉस आणि एनएएस-ऑप्टिमाइझ्ड आयर्नवुल्फ प्रो यांचे ऑन-प्रिम एआयसाठी योग्य वेळी आगमन
एज एआय ही आता भविष्यकाळीन संकल्पना राहिलेली नाही- ती आत्ता प्रत्यक्षात येत आहे. आयडीसीच्या मते, रिटेल, उत्पादन आणि वित्तीय सेवा यांसारखे उद्योग व्हिडिओ अॅनालिटिक्स, प्रेडिक्टिव मेण्टेनन्स आणि फसवणूक ओळखणे यांसाठी सक्रियपणे एआयचा उपयोग करत आहेत. या स्थित्यंतरामुळे विभाजित स्टोरेज आर्किटेक्चर्सच्या स्वीकृतीला वेग मिळत आहे, त्यामुळे कम्युट स्टोरेजपासून वेगळे काढले जात आहे आणि अधिक लवचिक व विस्तारण्याजोगी संरचना प्रत्यक्षात आणणे शक्य होत आहे.
उच्चक्षमतेच्या, ऊर्जाकार्यक्षम स्टोरेजची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सीगेट एक्सॉस एम ३० टीबी ड्राइव्ह तयार करण्यात आली आहे. ही ड्राइव्ह कंपन्यांना स्टोरेज विस्तारण्यासाठी, डेटा प्लेसमेंटच्या अनुकूलनासाठी आणि कामगिरी व टिकाऊपणा या दोन्हींबाबत तडजोड न करता रिअल-टाइम एज अॅनालिटिक्सला मदत करण्यासाठी सक्षम करू शकते.
एआय-पॉवर्ड उपयोजने अधिकाधिक प्रसृत होतील तशा ऑन-प्रिमायसिस एनएएस प्रणाली उत्क्रांत होऊन त्यांचे रूपांतर इंटेलिजंट डेटा केंद्रांमध्ये होईल— व्हिडिओ अॅनालिटिक्स, इमेज रेकग्निशन, रिट्रीव्हल-ऑगमेण्टेड जनरेशन (आरएजी) आणि ‘एज’ उपकरणांमध्ये तर्क व पुराव्यांच्या जोरावर निष्कर्ष काढणे आदी प्रगत कार्यभारांसाठी ती सहाय्य करू शकेल. एआयचे अभिसरण, आयओटी आणि हायब्रिड क्लाउड यांमुळे उच्च क्षमतेच्या, उच्च एकात्मीकरण होत असलेल्या एनएएस सोल्युशन्सच्या मागणीला चालना मिळत आहे. ही सोल्युशन्स मोठ्या, रचना नसलेल्या डेटासंचांचे व्यवस्थापन कमी विलंब लावून अधिक वेगाने करू शकतात.
जागतिक एनएएस बाजारपेठ २०३४ सालापर्यंत १७ टक्क्यांहून अधिक सीएजीआरवर वाढणार असल्याचा अंदाज अलीकडील बाजारपेठ विश्लेषणातून दिसून आला. डिजिटल रूपांतरण आणि एआय व बिग डेटा अॅनालिटिक्स यांच्या उदयामुळे हे शक्य झाले आहे.
“ऑन-प्रिमायसिस एआय कार्यभारांसाठी क्यूएनएपी एनएएस प्रणाली वापरली जाण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे उद्योगांना स्थानिक एआय मॉडेल्स चालवणे शक्य होते तसेच आरएजी व एलएलएम तंत्रज्ञानांचा वापर स्थानिक डेटासंचांवर प्रक्रिया करण्यासाठी व त्यांच्या विश्लेषणासाठी करता येतो,” असे क्यूएनएपीचे उत्पादन व्यवस्थापक धवल पनारा म्हणाले. “सीगेटच्या आयर्नवुल्फ प्रो ३० टीबी ड्राइव्हचा अंतर्भाव करून आम्ही पेटाबाइट दर्जाचे, उच्च एकात्मीकरण शक्य असलेले स्टोरेज देऊ शकतो. त्यामुळे वेगवान उपलब्धता, खात्रीशीर कामगिरी आणि विस्तारण्याजोगी संरचना हे सगळे एकदम साध्य होऊ शकते.
“एआय कार्यभार टोकाच्या वातावरणाकडे (एज एन्व्हॉर्न्मेंट) सरकण्याचे प्रमाण वाढले असल्याने स्थानिक डेटा प्रक्रियेसाठी खात्रीशीर उच्च क्षमतेचे स्टोरेज अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. सीगेटच्या आयर्नवुल्फ प्रो ३० टीबी ड्राइव्ह्ज यूग्रीन एएनएस प्रणालींना आवश्यक असलेला ठोस पाया पुरवतात. स्थानिक एआय उपयोजनांना गरजेची असलेली प्रचंड विस्तारक्षमता आणि कार्यात्मक स्थैर्य देतात,” असे यूग्रीनच्या इंटरनॅशनल बिझनेस विभागाचे प्रमुख ईव्हान ली म्हणाले.
उपलब्धता:
एक्सॉस एम ३० टीबी ड्राइव्ह आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे. सीगेटच्या अधिकृत सहयोगींमार्फत ती ७४,९९९ रुपये एवढ्या सूचित रिटेल किमतीला (एसआरपी) खरेदी करता येईल. आयर्नवुल्फ प्रो ३० टीबी ड्राइव्ह ७५,९९९ रुपये एवढ्या सूचित रिटेल किमतीला (एसआरपी) विनंतीवरून उपलब्ध करून दिली जात आहे. अधिक माहितीसाठी तसेच खरेदीबाबतच्या चौकशीसाठी ग्राहकांना त्यांच्या स्थानिक सीगेट वितरकांशी किंवा अधिकृत पुनर्विक्रेत्यांशी (रिसेलर्स) संपर्क साधण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या- सीगेट website.
सीगेट टेक्नोलॉजी विषयी:
सीगेट ही मास-कपॅसिटी डेटा स्टोरेज क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी आहे, कंपनी गेल्या चार दशकांहून अधिक काळात ४.५ अब्ज टेराबाइट्सहून अधिक स्टोरेज पुरवले आहे. विस्तारण्याजोगी, शाश्वत आणि सुरक्षित स्टोरेज सोल्यूशन्स पुरवून अगदी टोकापासून, गाभ्यापासून ते क्लाउडपर्यंत विश्वास निर्माण करण्याचे काम सीगेट करते. अधिक माहितीसाठी- www.seagate.com.


