Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे दि. 30 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 व्या जयंती कार्यक्रमाचे 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येथे सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयातर्फे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रा. प्रकाश नाईक यांचे “समतावादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून पोवाडे, फक्कड, “स्मशानातील सोने” या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments