Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedफाइबकडून पुणेकरांसाठी रूफटॉप सोलार फायनान्सिंगचा शुभारंभ

फाइबकडून पुणेकरांसाठी रूफटॉप सोलार फायनान्सिंगचा शुभारंभ

पुणे, ३१ जुलै २०२५: फाइब या भारतातील आघाडीच्‍या डिजिटल लेण्डिंग प्‍लॅटफॉर्मने आपल्‍या रूफटॉप सोलार फायनान्सिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या सोल्‍यूशनचा मध्‍यम-उत्‍पन्‍न असलेल्‍या कुटुंबांसाठी शुद्ध ऊर्जा अवलंबन अधिक सोपे करण्‍याचा मनसुबा आहे. महाराष्‍ट्र सरकार रूफटॉप सोलार अवलंबनाला सक्रियपणे प्रेरित करत आहे, जेथे पुणे १३० मेगावॅट क्षमतेसह अग्रस्‍थानी आहे.

पुण्यात निवासी छतावरील सौरऊर्जा वापरासाठी मोठी क्षमता आहे. वाढती शहरी लोकसंख्या आणि पर्यावरणपूरक उपायांबद्दल लोकांमध्ये वाढती जागरूकता पाहता शहर जलद सौरऊर्जा वापरासाठी सज्ज आहे. पुणे तसेच महाराष्ट्रात आपली उपस्थिती आणखी वाढवण्यासाठी आणि सहजपणे उपलब्‍ध होणारे फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी फाइबने फ्रेयर एनर्जी आणि सोलर स्क्वेअर यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. सध्या देशभरातील १०० हून अधिक सोलार इन्‍स्‍टॉलेशन ईपीसी कंपन्यांसोबत कंपनीचा सहयोग आहे आणि सौर उत्पादक व सेवा प्रदात्यांसह भागीदारीद्वारे वितरण अधिक दृढ करण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहे.

फाइबचा हा उपक्रम सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य घर: मुफ्त बिजली योजना’ला पाठिंबा देतो. या उपक्रमामधून वंचित समुदायांना कर्ज सुविधा अधिक उपलब्‍ध करून देण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते. जन समर्थ पोर्टलवर पॅनेल केलेल्या पहिल्या प्रमुख डिजिटल कर्जदात्यांपैकी एक असलेली फाइब रूफटॉप सोलार परिसंस्‍थेमध्‍ये किफायतशीरपणा संदर्भातील तफावतीला दूर करण्‍यास सज्‍ज आहे.

या क्षेत्रातील बहुतेक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स (वित्तपुरवठा उपाय) मोठ्या प्रमाणात किंवा व्यावसायिक इन्‍स्‍टॉलेशन्‍सवर लक्ष केंद्रित करतात, तर फाइबचे उत्पादन मध्यम उत्पन्‍न असलेल्या कुटुंबांसाठी आणि निवासी विभागासाठी तयार केले आहे. ग्राहकांना आता ५ लाख रूपयांपर्यंत तारणमुक्‍त कर्ज मिळू शकते, ज्यामध्ये प्रकल्प खर्च १०० टक्‍के कव्हर केला जातो-पॅनेल आणि इन्‍स्‍टॉलेशनचा खर्च दोन्ही समाविष्ट आहेत. या ऑफरमध्ये पूर्णपणे डिजिटल अॅप्लिकेशन प्रक्रिया आहे, जेथे १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत आणि कागदपत्रांशिवाय त्‍वरित कर्ज मिळते. कोणतेही फोरक्लोजर किंवा लुप्‍त शुल्क नाही, ज्‍यामधून कर्जदारांना संपूर्ण पारदर्शकता आणि स्थिरतेची खात्री मिळते.

हा वित्तपुरवठा १९-६० वर्ष वयोगटातील पगारदार व्यक्‍ती आणि २३-६५ वयोगटातील स्वयंरोजगार असलेल्या व्यक्‍तींसाठी खुला आहे. विशेष म्हणजे, कर्ज अर्जदार मालमत्तेचा मालक नसला तरीही त्‍याचे नातेवाईक कर्जासाठी अर्ज करू शकतात, ज्‍यासाठी त्‍यांना पात्रता निकषांची पूर्तता करावी लागते. यामुळे संयुक्‍त किंवा कुटुंबाच्‍या मालकीच्‍या मालमत्तेत राहणाऱ्या व्‍यक्‍तींना देखील अधिक प्रमाणात कर्ज सुविधा उपलब्‍ध होते.

“लहान शहरांमधील विशेषत: मध्‍यम उत्‍पन्‍न असलेल्‍या कुटुंबांमध्‍ये छतावर सौर पॅनेल बसवण्‍यासाठी किफायतशीरपणा हा सर्वात मोठा अडथळा आहे. या सोल्‍यूशनसह आम्‍ही सर्वाधिक गरज असलेल्‍यांना शुद्ध ऊर्जा उपलब्‍ध करून देत आहोत. आमची ऑफरिंग १ कोटी कुटुंबांना सौरऊर्जेच्‍या माध्‍यमातून वीज देण्‍याच्‍या सरकारच्‍या मिशनला पाठिंबा देते आणि आम्‍हाला भारतासाठी अधिक सर्वसमावेशक व शाश्वत भविष्‍य घडवण्‍यामध्‍ये आमची भूमिका बजावण्‍याचा अभिमान वाटतो,” असे फाइबचे सह-संस्‍थापक व ग्रुप सीईओ अक्षय मेहरोत्रा म्‍हणाले.

फाइबचे सोल्‍यूशन सर्वसमावेशक ऊर्जेकरिता वित्तपुरवठा करण्‍याच्‍या दिशेने पाऊल आहे, जे भारताच्‍या हरित भविष्‍याला चालना देण्‍याच्‍या मिशनला पाठिंबा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, तसेच भारतभरातील कुटुंबं मागे राहणार नाहीत याची खात्री देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments